नवी दिल्ली, 23 मार्च : चिनी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरर कंपनी वनप्लसने, वनप्लस 9 सीरीज इव्हेंट (OnePlus 9 Series Launching in India) लाँचिंगमध्ये वनप्लस 9 प्रो (OnePlus 9 Pro) लाँच केला आहे. या स्मार्टफोनची सर्वात मोठी बाब फोनचा जबरदस्त कॅमेरा आहे. यात 50 मेगापिक्सलचा (50MP) एक अल्ट्रा-वाईड कॅमेरा (Ultra-Wide Camera) देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल असून हा सोनी आयएमएक्स 789 सेंसरयुक्त (Sony IMX789 Sensor) आहे. हा सेंसर खास वनप्लस सीरीजसाठी तयार करण्यात आला आहे. वनप्लस 9 प्रो फोनला देण्यात आलेल्या कॅमेरामध्ये ऑरेंज शटर बटण देण्यात आलं आहे, जो ओरिजनल हॅसलब्लेड कॅमेरामध्ये दिसतो. त्याशिवाय या स्मार्टफोनमध्ये एक फ्री-फ्लो कॅमेराही देण्यात आला आहे, ज्याचा मॅक्रो सेंसर 4 सेंटीमीटर जवळच्या ऑब्जेक्टला सहजपणे कॅप्चर करू शकतो. 50 मेगापिक्सल कॅमेऱ्यामुळे जेव्हा अल्ट्रा-वाईड शॉट घेण्यात येईल, त्यावेळीदेखील कोणत्याही प्रकारचं डिस्टॉर्शन होणार नसल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या फोनमधून घेण्यात आलेल्या फोटोजमध्ये नॅचरल कलर्स असतील. oneplus 9 pro च्या कॅमेरामध्ये कलर अॅक्योरसीवर सर्वाधिक लक्षकेंद्रीत करण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 3 रियर कॅमेरा दिले आहेत.
ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा, 8K मध्ये शूटिंग करता येणार - कंपनीने फोनमध्ये मोनोक्रोम फोटोजसाठी एक ब्लॅक अँड व्हाईट कॅमेराही दिला आहे. तसंच यात 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेराही देण्यात आला आहे. याचा फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सल इतका आहे. फोनला हॅसलब्लेड प्रो मोड देण्यात आला आहे. वनप्लस युजर्स 12Bit Raw मोडमध्ये शूटही करू शकतील. तसंच यात 8K रिजॉल्यूशनमध्ये व्हिडीओ कॅप्चर करता येईल. 4K रिजॉल्यूशनमध्ये स्लो-मोशन व्हिडीओ शूट केला जाऊ शकतो. तसंच लो-लाईट कंडिशनमध्ये चांगल्या प्रतीचा व्हिडीओ तयार करण्यासाठी नाईटस्कॅप व्हिडीओ 2.0 ही देण्यात आला आहे.
oneplus 9 pro ला अॅल्युमिनियम फ्रेम देण्यात आली आहे. हा फोन मॉर्निंग मिस्ट, पाईन ग्रीन आणि स्टेलर ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. बॅटरीच्या चांगल्या वापरासाठी एलटीपीओ डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनवर गेम खेळणाऱ्यांसाठी फोनला हायपरटच स्क्रिन देण्यात आली आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 5G नेटवर्क सपोर्टसह देण्यात आला आहे.
30 मिनिटांत होईल 100 टक्के चार्ज - कनेक्टिव्हिटीसाठी यात वायफाय 6 आणि ब्लूटूथ 5.2 देण्यात आला आहे. तसंच फोनला 5 लेयर गेमिंग ग्रेड कूलिंग सिस्टम देण्यात आलं आहे. तसंच फास्ट चार्जरसह फोन उपलब्ध करण्यात आला आहे, जो केवळ 30 मिनिटांत 100 टक्के चार्ज होण्याचा दावा कंपनीने करण्यात आला आहे. तसंच 43 मिनिटांमध्ये 100 टक्के वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. चांगल्या परफॉर्मेन्ससाठी OxygenOS देण्यात आला आहे. फोनला 4500 mAh ची पॉवरफुल बॅटरी असून अधिक रॅमसाठी वर्च्युअल रॅमही देण्यात आला आहे.