JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Gmail मध्ये स्पेस कमी आहे? या सोप्या ट्रिक्सने अशी करा जागा

Gmail मध्ये स्पेस कमी आहे? या सोप्या ट्रिक्सने अशी करा जागा

जीमेलचं फ्री स्टोरेज एकदा फुल झाल्यानंतर कोणालाही मेल पाठवता येत नाही की, कोणाचे मेल येऊही शकत नाहीत, अशी समस्या निर्माण होते. त्यामुळे हा स्टोरेज रिकामं करणं गरजेचं होतं. जाणून घ्या काही सोप्या टिप्स…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 मार्च : सर्व गुगल अकाउंट्समध्ये 15 GB डिजिटल स्टोरेज स्पेस मिळतो. जेथे गुगलसंबंधी गोष्टी स्टोर करता येतात. या स्पेसचा वापर जीमेल, गुगल फोटोज, गुगल ड्राईव्ह, गुगल शीट्स, स्लाईड्स आणि गुगल डॉक्स यांसारख्या सर्विसेससाठी करता येतो. हे फ्री स्टोरेज एकदा फुल झाल्यानंतर कोणालाही मेल पाठवता येत नाही की, कोणाचे मेल येऊही शकत नाहीत, अशी समस्या निर्माण होते. त्याशिवाय कोणतंही गुगल डॉक किंवा गुगल शिट बनवता येत नाही. Gmail क्लियर करा - सर्वात आधी जीमेलचे नको असलेले मेल क्लियर करा. अशा मेलमुळे स्टोरेज भरतं आणि काही मेलमध्ये फाईल्स अटॅच असल्याने स्पेस लवकर भरते. प्रमोशनल, सोशल आणि स्पॅम मेल सेक्शनमध्ये सिलेक्ट ऑल करुन हे नको असलेले सर्व मेल डिलिट करा.

(वाचा -  तो शेर तर तुम्ही सव्वाशेर! या चुका टाळल्यात, तर कधीच होणार नाही ऑनलाईन फसवणूक )

जर एखादा प्रमोशनल मेल आवश्यक आहे, तो आधी सर्च बारमध्ये मेल आयडी टाईप करुन सर्च करा त्यानंतर सर्व मेल डिलिट करा. अशीच पद्धत बाकी मेलसाठीही वापरता येते.

(वाचा -  Facebook वर तुमचं प्रोफाईल कोणी चेक केलं? असं घ्या जाणून )

गुगल ड्राईव्ह क्लिन करा - मेलशिवाय गुगल ड्राईव्हही स्टोरेज स्पेस कमी करतो, कारण यात हाय क्वॉलिटी फोटो आणि डॉक्युमेंट्स असतात. ड्राईव्ह क्लिन करण्यासाठी गुगल अकाउंटच्या ड्राईव्ह सेक्शनमध्ये स्टोरेज बटणवर क्लिक करा. त्यानंतर स्टोर फाईल्स दिसतील. ज्याला फाईल साईजनुसार, कोणती फाईल किती साईजची आहे, ती कामाची आहे की नाही ते सॉर्ट करुन फाईल्स डिलीट करा. डिलिटेड फाईल्स ट्रॅशमध्ये जातील. त्यानंतर ट्रॅशमध्ये जाऊन फाईल परमनेंट डिलिट करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या