JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / लग्नानंतर Aadhaar Card मध्ये तुमचं आडनाव कसं बदलाल? पाहा सोपी प्रोसेस

लग्नानंतर Aadhaar Card मध्ये तुमचं आडनाव कसं बदलाल? पाहा सोपी प्रोसेस

आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे. लहान मुलांच्या जन्मानंतरही लगेच आधार कार्ड मिळण्याची सुविधा आहे. तर दुसरीकडे मुलींना लग्नानंतर आडनावही अपडेट गरजेचं असल्यास ते अपडेटही करता येतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 जानेवारी : भारतात Aadhaar Card सर्वात महत्त्वपूर्ण कागदपत्रांपैकी एक आहे, जे ओळखपत्र तसंच अॅड्रेस प्रूफ म्हणूनही महत्त्वाचं ठरतं. आधार कार्ड नसल्यास तुमची अनेक कामं अडकू शकतात. त्यामुळे आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे. लहान मुलांच्या जन्मानंतरही लगेच आधार कार्ड मिळण्याची सुविधा आहे. तर दुसरीकडे मुलींना लग्नानंतर आडनावही अपडेट गरजेचं असल्यास ते अपडेटही करता येतात.

काय आहे मास्क्ड Aadhaar Card? असा होईल फायदा, पाहा डाउनलोड करण्याची सोपी प्रोसेस

आधार कार्डमध्ये 12 अंकी यूनिक नंबर दिला जातो, जो बायोमेट्रिकशी जोडलेला असतो. कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी आधार कार्डची गरज असते.

Car Driving शिकायचं आहे?Maruti Suzukiने सुरू केले हे खास कोर्स, पाहा किती आहे फी

लग्नानंतर आधार कार्ड अपडेट कसं कराल? ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने आधार कार्ड अपडेट करता येतं. सर्वात आधी UIDAI च्या www.uidai.gov.in अधिकृत वेबसाइटवर लॉगइन करा. त्यानंतर Name Change पर्यायावर क्लिक करुन नावात बदल करू शकता. दोन्ही नाव आणि आडनाव बदलू शकता. आडनाव बदलण्यासाठी काही डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा. OTP टाकल्यानंतर नाव बदलण्यासाठीचा फॉर्म सबमिट होईल.

WhatsApp वरुन डाउनलोड करा Corona Vaccine Certificate, पाहा सोपी प्रोसेस

Offline रित्या कसे करता येतील बदल - आधार कार्डमध्ये ऑफलाइन आडनाव बदलण्यासाठी आधार केंद्रात जावं लागेल. त्यानंतर आधारमध्ये बदल करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्र द्यावी लागतील. इथे बायोमेट्रिक अपडेट केलं जाईल. आधार कार्डमध्ये ऑफलाइन आडनाव बदलण्यासाठी 50 रुपये भरावे लागतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या