नवी दिल्ली, 29 जून : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आता मोबाईलचा वापर करतात. गेम खेळण्यासाठी लहान मुलं घरातील कोणाचाही मोबाईल घेतात. जवळपास सर्वच मुलांना सर्व फीचर्सची माहिती असते. इंटरनेटचा वापर, मोबाईल ऑपरेट अशा सर्वच गोष्टी त्यांना येतात. मुलं इंटरनेटवर तुमच्या नकळत काही सर्च करत असतील, तर ते धोकादायकही ठरू शकतं. परंतु सर्च हिस्ट्री डिलीट केल्यानंतरही याबाबत माहिती मिळू शकते. तसंच, जर तुमचा फोन एखाद्याच्या हातात गेल्यास त्याने तुमच्या फोनवर काही सर्च केलं का हे पाहता येऊ शकतं. गुगल हिस्ट्री डिलीट केली असेल, तरी कोणी काय सर्च केलं याची माहिती एका ट्रिकद्वारे मिळवता येईल.
डिलीटेड Google सर्च हिस्ट्री - - सर्वात आधी Google Chrome ओपन करा. - उजव्या बाजूला वर तीन डॉट दिसतील. त्यावर क्लिक करा. - नवी विंडो ओपन होईल, यात सेटिंग पर्यायावर क्लिक करा.
- Site Settings ऑप्शन दिसेल. त्यात सर्वात वर All Sites ऑप्शन दिसेल. इथे क्लिक करुन सर्व साईटचे डिटेल्स दिसतील.
Google Syns - गुगलची डिलीटेड हिस्ट्री जाणून घेण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये Google Syns ऑन असणं गरजेचं आहे. जर हा पर्याय तुमच्या फोनमध्ये ऑफ असेल. तर तुम्ही डिलीटेड हिस्ट्रीचे डिटेल्स घेऊ शकत नाहीत.