JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Google Map द्वारे शोधा हरवलेला स्मार्टफोन; अशी होईल मदत

Google Map द्वारे शोधा हरवलेला स्मार्टफोन; अशी होईल मदत

मोबाईल हरवला किंवा चोरी झाला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. लॉकडाउनमध्ये अनेक राज्यात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सकडून अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची डिलीव्हरीही होत नाही, त्यामुळे नवा फोन खरेदी करणं कठीण ठरू शकतं. परंतु एका ट्रिकने चोरी झालेल्या स्मार्टफोन शोधण्यास मदत होऊ शकते.

जाहिरात

गुगल मॅप्सवर युजर्स आपल्या आवडत्या ठिकाणांचा डेटा एका लिस्टमध्ये एकत्रित ठेवू शकतो आणि नंतर तो पडताळू शकतो. जर एखाद्या वेबसाईटवर गुगल मॅप्स वर एम्बेडेड मॅप्स (Embedded Maps) असेल तर युजर तो गुगल मॅप्सवर सेव्ह करु शकतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 5 मे : स्मार्टफोन सर्वाच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये तर स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर होत आहे. अशात मोबाईल हरवला किंवा चोरी झाला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. लॉकडाउनमध्ये अनेक राज्यात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सकडून अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची डिलीव्हरीही होत नाही, त्यामुळे नवा फोन खरेदी करणं कठीण ठरू शकतं. परंतु एका ट्रिकने चोरी झालेल्या स्मार्टफोन शोधण्यास मदत होऊ शकते. Google Maps वरुन असा शोधता येईल स्मार्टफोन - - अँड्रॉईड युजर्सकडे Find My Device हे फीचर असतं. हे फीचर त्या जागा आणि लोकेशन ट्रॅक करतं, जिथे तुम्ही गेले आहात. तर अॅपल युजर्सकडे Find My Phone नावाचं फीचर असतं. - गुगल मॅपच्या मदतीने हरवलेला स्मार्टफोन शोधण्यासाठी युजरकडे फोन किंवा लॅपटॉप असावा लागेल. ज्यात इंटरनेट कनेक्ट असावं. त्याशिवाय Gmail अकाउंटचा पासवर्ड आणि ID असावा. - सर्वात आधी गुगलवर www.googlemaps.google.co.in टाईप करा. त्यानंतर गुगल मॅप ओपन होईल.

(वाचा -  तुमची मुलंही स्मार्टफोन वापरतात? iOS हून 8 पटीने अधिक धोकादायक आहेत Android Apps )

- इथे Google ID टाकावा लागेल, जो तुमच्या हरवलेल्या स्मार्टफोनशी लिंक्ड असेल. आयडी साइन-इन (Sign-In) झाल्यानंतर, वरच्या बाजूला तीन डॉट दिसतील. - त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Your Timeline हा पर्याय दिसेल. Timeline पर्याय निवडल्यानंतर वर्ष, महिना, दिवस टाकावा लागेल, ज्या दिवसाची युजरची लोकेशन हिस्ट्री (Location History) माहित करायची आहे. सर्व माहिती भरल्यानंतर युजरची Location History दिसेल.

(वाचा -  Gmail अकाउंट हॅक झाल्यास असं करा रिकव्हर; जाणून घ्या या सोप्या 8 स्टेप्स )

- हे फीचर कोणत्याही अँड्रॉईड फोनमध्ये असलेल्या गुगल मॅप्समध्ये वापरता येतं. गुगल मॅपमध्ये तोच आयडी साइन-इन करा, जो तुमच्या मोबाईलशी लिंक आहे. - युजरचा मोबाईल आणि त्यात असलेलं लोकेशन सर्विस फीचर ऑन असल्यास हे फीचर काम करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या