यात तुमचा फोन नंबर किंवा ईमेल पब्लिक्ली सर्चमध्ये सामिल न होण्यासाठी otp in करू शकता.
नवी दिल्ली, 20 मार्च : स्मार्टफोनवर (Smartphone) फेसबुक (Facebook) वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने एक नवा निर्णय घेतला आहे. फेसबुकने मोबाईल डिवाईसवर लॉग-इन करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) लागू करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच स्मार्टफोनवर फेसबुकचा वापर करणाऱ्या सर्वांना टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (authentication process) प्रक्रिया करावी लागणार आहे. फेसबुकने हा निर्णय सुरक्षेच्यादृष्टीने घेतला आहे. यापूर्वी फेसबुकने 2017 मध्ये डेस्कटॉपसाठीही अशाप्रकारे सुरक्षा प्रमाणीकरणाला परवानगी दिली होती. आता ही सुरक्षा स्मार्टफोनवरुन फेसबुक वापरणाऱ्या युजर्ससाठीही लागू होणार आहे. फेसबुकचा हा नियम iOS आणि Android मोबाईल डिवाईस दोन्ही युजर्ससाठी आहे.
Two Factor Authentication काय आहे? टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन एक सिक्योरिटी फीचर आहे. हे तुमच्या फेसबुक अकाउंटला कोणत्याही अज्ञात डिवाईसवरुन लॉग-इन करताना प्रत्येकवेळी पासवर्ड आणि अकाउंटला सुरक्षित ठेवण्यास मदत करतं. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमच्या युजर्सच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी, युजर्सला हॅकर्सपासून वाचवण्यासाठी सुरक्षित प्लॅटफॉर्म देत आहोत. Two Factor Authentication सुरु करण्यासाठी सर्वात आधी Settings मध्ये जावं लागेल. - Security and Login वर क्लिक करा. - त्यानंतर two factor authentication वर क्लिक करावं लागेल. यात Edit वर क्लिक करून Enable करा.
तसंच, या आठवड्याच्या सुरुवातीपासून ट्विटरनेही लोकांना सिक्योरिटी फीचरचा उपयोग केवळ ऑथेंटिकेशन प्रक्रियेसाठी करण्याची घोषणा केली आहे. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म प्रत्येक अकाउंटला अनेक सिक्योरिटी कीजची परवानगी देत असल्याची माहितीही कंपनीने दिली आहे.