नवी दिल्ली, 6 डिसेंबर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. Facebook चे CEO मार्क झुकरबर्ग जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या लीस्टमध्ये सामिल आहेत. पण मार्क झुकरबर्ग यांचा पगार किती आहे? मार्क झुकरबर्ग यांची बेसिक सॅलरी कमी आहे. परंतु त्यांच्या सुरक्षेवर इतका खर्च केला जातो, जो हजारो लोकांच्या पगाराइतका आहे.
फेसबुकचे फाउंडर आणि सीईओ मार्क झुकरबर्ग असून त्यांची बेसिक सॅलरी केवळ एक डॉलर आहे. मागील वर्षी त्यांनी बोनस पेमेंटदेखील घेतलं नव्हतं. मार्क झुकरबर्ग अशा सीईओंपैकी आहेत, ज्यांना वाटतं, की फुल टाइम कर्मचाऱ्यांना एक शुल्क दिलं जावं. त्यामुळेच त्यांची सॅलरी इतकी कमी आहे.
सुरक्षेवर खर्च होतात कोट्यवधी रुपये - फेसबुक सीईओंची सॅलरी केवळ एक डॉलर आहे परंतु त्यांच्या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. कंपनीच्या अॅन्युअल एग्झिक्यूटिव कंपन्सेशन रिपोर्टनुसार, 2020 मध्ये फेसबुकने मार्क झुकरबर्ग यांच्या सिक्योरिटीवर 23.4 मिलियन डॉलर जवळपास 1 अब्ज 76 कोटी रुपये खर्च केले जात असल्याचं सांगितलं.
झुकरबर्ग यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाटी कंपनीकडून प्री-टॅक्स अलाउएन्स म्हणून 10 मिलियन डॉलर 75 कोटी रुपयांहून अधिक दिले जातात. केवळ मार्क झुकरबर्ग यांच्यावर 13.4 मिलियन जवळपास 1 अब्ज रुपयांहून अधिक खर्च केला जातो. या खर्चात त्यांचा प्रवास आणि रेसिडेंशियल सिक्योरिटी सामिल आहे.