JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / सातत्याने कमी होऊ लागला आहे Duel Sim चा ट्रेंड, काय आहे यामाचं कारण? वाचा

सातत्याने कमी होऊ लागला आहे Duel Sim चा ट्रेंड, काय आहे यामाचं कारण? वाचा

एक काळ असा होता जेव्हा बहुतेक वापरकर्त्यांकडे ड्युअल सिम असायचे, परंतु आता लोकांमध्ये ड्यूल सिमचा क्रेज संपत चालला आहे, हे असं का होत आहे? यामागचं कारण समोर आलं आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 17 सप्टेंबर : एक काळ असा होता जेव्हा बहुतेक वापरकर्त्यांकडे ड्युअल सिम असायचे, परंतु आता लोकांमध्ये ड्यूल सिमचा क्रेज संपत चालला आहे. सुरुवातीला लोक फोन ड्यूअल सिम आहे का? ते पाहून विकत घ्यायचं. परंतू आता लोकांना याचा काही फरक पडत नाही. ज्यामुळे पुढील तीन वर्षांत याची मागणी 25% कमी होण्याची अपेक्षा आहे. संशोधन फर्म CLSA ने अहवाल दिला आहे की FY222 पर्यंत ड्युअल सिम वापरकर्त्यांची संख्या 140 दशलक्ष होती, जी FY25 पर्यंत 105 दशलक्ष (100 दशलक्ष) पर्यंत खाली येऊ शकते. एका मीडिया अहवालानुसार, 2012-22 या आर्थिक वर्षात भारतात स्मार्टफोनची मालकी जवळपास 50% ने वाढून 700 दशलक्ष झाली आहे. त्याच वेळी, असा अंदाज आहे की, ड्युअल सिम वापरकर्त्यांमध्ये 105 दशलक्ष आणि 4G फीचर फोन वापरकर्त्यांमध्ये 50 दशलक्ष पर्यंत घट होऊ शकते. हे वाचा : गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडची फोन गॅलरी चेक करायची पण तुमच्याकडे पासवर्ड नाही? वापरा ‘ही’ Trick अहवालात असे नमूद केले आहे की, 2016 मध्ये रिलायन्स जिओने मोफत व्हॉईस कॉलिंग आणि कमी किमतीच्या डेटा योजना आणल्या आणि त्यानंतर 2019 मध्ये टॅरिफ वाढल्याने ड्युअल सिम वापरात मोठी वाढ झाली. हळूहळू ते कमी होऊ लागले. यानंतर, नोव्हेंबरमध्ये टॅरिफ किंमत 20-25% वाढवल्यानंतर, ड्युअल सिमच्या संख्येत आणखी घट झाली. Reliance Jio, Bharti Airtel आणि Vodafone Idea यांनी जाहीरपणे सांगितले आहे की आर्थिक वर्ष 2023 या क्षेत्राचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी टॅरिफमध्येही वाढ होऊ शकते. हे वाचा : Jio 5G लाँच होण्यापूर्वी करा ‘हे’ महत्त्वाचं काम, नाहीतर वापरता येणार नाही हायस्पीड इंटरनेट म्हणूनच तज्ञांचे म्हणणे आहे की येत्या काळात, बहुतेक वापरकर्ते दुसरे सिम वापरणे बंद करतील कारण प्रीपेड तसेच पोस्टपेड स्तरावर दोन मासिक भाडे योजना भरणे लोकांच्या खिशाला भारी पडू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या