मुंबई, 17 सप्टेंबर: सध्या 5G स्मार्टफोनची मागणी खूप वाढली आहे. कारण भारतात लवकरच 5G सेवा (5G India) सुरू होणार आहे. भारतातील 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाल्यानंतर विविध दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या 5G सेवा सुरू करण्याच्या योजना जाहीर केल्या. खाजगी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने देखील 5G सेवा दिवाळीपर्यंत सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. जर तुम्ही Jio वापरकर्ता असाल आणि 5G सेवा सुरू होण्याची वाट पाहत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागेल.
Jio 5G सेवा सुरू होणार:
नुकत्याच Jio AGM 2022 मध्ये कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी घोषणा केली की, देशात Jio 5G सेवा दिवाळीला सुरु होत आहेत. पहिल्या टप्प्यात Jio 5G फक्त दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता अशा मोठ्या शहरांमध्ये लाँच केलं जात आहे.
Jio 5G वापरण्यासाठी करावं लागेल हे काम:
कंपनीकडून ही माहिती समोर आली आहे की जर तुम्ही Jio यूजर असाल आणि या चार शहरांपैकी एका शहराचे रहिवासी असाल तर Jio 5G वापरण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल. ज्या स्मार्टफोनवर 4G सपोर्ट दिला जात आहे त्या स्मार्टफोनवर 5G सेवा काम करणार नाही. ही हाय-स्पीड इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला 5G स्मार्टफोन खरेदी करावा लागेल.
हेही वाचा: भारतातली पहिली फ्लेक्स-फ्युएल कार 28 सप्टेंबरला होणार लाँच, काय होईल फायदा? वाचा सविस्तर
तुमचा स्मार्टफोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो का?
तुमचा फोन 5G सेवांना सपोर्ट करतो की नाही हे जाणून घ्यायचं असल्यास, या चरणांचं अनुसरण करा. तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनच्या सेटिंग्जवर जा, त्यानंतर 'वायफाय आणि नेटवर्क' या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर 'सिम आणि नेटवर्क' निवडा. येथे तुम्हाला 'प्राधान्य नेटवर्क प्रकार' खाली दिसेल ज्या तंत्रज्ञानाला तुमचा फोन सपोर्ट करतो. जर तुम्हाला लिस्टमध्ये 5G दिसत असेल तर तुमचा फोन या सेवेसाठी वैध आहे आणि जर नसेल तर तुम्हाला 5G सपोर्ट असलेला फोन खरेदी करावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.