JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / सावधान! तुमचा Smartphone तुमची हेरगिरी करतोय का?

सावधान! तुमचा Smartphone तुमची हेरगिरी करतोय का?

तुमचा स्मार्टफोन तुमचं बोलणं ऐकत तर नाही ना? ज्या वस्तूबाबत चर्चा होत होती, त्याचीच जाहिरात कशी दिसू लागली?

जाहिरात

स्पेलिंग - असली आणि नकली App मध्ये मोठा फरक स्पेलिंगचा असतो. स्पेलिंगमध्ये एखादा शब्द कमी किंवा जास्त वाढवला जातो. स्पेलिंगच्या सुरुवातीला, शेवटी किंवा मध्ये काही बदल केले जातात. त्यामुळे कोणतंही अ‍ॅप डाउनलोड करताना हे पाहणं गरजेचं आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेलबर्न, 22 जून: कधी असं झालंय का, की तुम्ही तुमच्या मित्रासोबत एखादी वस्तू खरेदी करण्याबाबत चर्चा केली आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी स्मार्टफोनवर त्याच वस्तूसंबंधी जाहिरात दिसली आहे? तुमचा स्मार्टफोन तुमचं बोलणं ऐकत तर नाही ना? ज्या वस्तूबाबत चर्चा होत होती, त्याचीच जाहिरात कशी दिसू लागली? स्विनबर्न यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीचे (Swinburne University of Technology) लेक्चरर डाना रेजाजादेगन यांनी दिलेल्या माहितीनुसार, याचा अर्थ असा की युजर्स आपल्या स्मार्टफोनला आधीच सर्व माहिती देत आहे, ज्याची त्याला गरज आहे. अधिकतर लोक आपली माहिती वेबसाईट आणि अ‍ॅपला देत असतात. एखादं अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर अ‍ॅप आपल्या फोनमधील डेटाची परमिशन मागतं. ज्यावेळी युजर Accept करुन परमिशन देतो, त्यावेळी ‘कुकीज’ ऑनलाईन गोष्टींच्या निगरानीची परवानगी देतं. ‘फर्स्ट-पार्टीज कुकीज’ वेबसाईटला युजरचा काही तपशील लक्षात ठेवण्याची परवानगी देतं. उदा. लॉगइन कुकीज युजरला लॉगइन तपशील सेव्ह करुन देतात, जेणेकरुन प्रत्येक वेळी पुन्हा ते टाकण्याची गरज भासू नये. स्विनबर्न यूनिव्हर्सिटीचे डाना रेजाजादेगन यांनी सांगितलं, की थर्ड पार्टी कुकीज अनेकदा एखाद्या मार्केटिंग कंपनीच्या असतात. ज्यांना युजरच अनेक प्रकारे आपल्या डेटापर्यंत पोहोच देतो. त्यानुसार जाहिरातदार युजरची आवड आणि गरजांना सामिल करुन त्यानुसार काम करतो. अनेक जाहिरात कंपन्या आपल्या उत्पादनाची लोकप्रियता ओळखण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे जाहिरातदार योग्य जाहिरातीसह योग्य ग्राहकालाही केंद्रीत करण्यासाठी अल्गोरिदममध्ये सुधारणा करतात. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) मध्ये अनेक मशीन लर्निंग तंत्र असतात, जे सिस्टमला युजरचा डेटा फिल्टर करण्यासह विश्लेषण करण्यासाठीही मदत करतात.

(वाचा -  राम मंदिर जन्मभूमी ट्रस्ट नावाने लाखोंची फसवणूक; फेक वेबसाईट बनवून उकळले पैसे )

असोसिएशन आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग (RL) युजरच्या वापारानुसार मिळालेल्या फिडबॅकच्या आधारे स्वत:ला प्रशिक्षित करू शकतो. सोशल मीडिया पोस्टवर लाईक केल्यामुळे युजर RL एजेंटला संकेत पाठवतो, आणि तो युजरला यात आवड असल्याचं ठरवतो. सोशल मीडियावर अनेक गोष्टी लाईक केल्यानंतर नंतर, RL सिस्टम युजरला अशा कंपन्याच्या जाहिराती पाठवतो. त्याशिवाय वय, ईमेल, लिंग, स्थान यावरही जाहिरातीच्या शिफारसी केल्या जातात. AI अल्गोरिदमद्वारे हेरगिरी? एक्सपर्ट्सनुसार, AI अल्गोरिदम डेटाच्या आधारे तुमच्या जवळपासच्या लोकांची या आधारे रँकिंग करू शकतो, की तुम्ही त्यांच्याशी किती संपर्कात आहात. त्यानंतर ते केवळ तुमच्या डेटाच्या आधारे नाही, तर तुमच्या मित्रांच्या आणि कुटुंबियांच्या एकत्र केलेल्या डेटाच्या आधारेही तुम्हाला केंद्रीत करू शकतात.

(वाचा -  तुमच्या कामाची बातमी! मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच )

अशात अ‍ॅप डेव्हलप करणाऱ्यांना डेटा जमा करण्यासाठी युजर्सची परवानगी घ्यावी लागते आणि यासाठी स्पष्ट अटी-नियम आहेत. त्यामुळे युजरला कोणतंही अ‍ॅप डाउनलोड करताना, त्यात डेटासाठीची परवानगी देताना सावध राहणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या