नवी दिल्ली, 28 मार्च : अॅपल डिव्हाईस (Apple Device)सध्या स्वस्त दरात, डिस्काउंटमध्ये खरेदी करण्याची संधी असल्याच्या अनेक ऑफर्स आहेत. परंतु अॅपलचा आयफोन, आयपॅड अशा कोणत्याही वस्तू खरेदी करताना सतर्क राहा. अशा ऑफर्स-डिल्समधून फसवणूक होण्याची शक्यता आहे. सध्या अॅपल डिव्हाईसबाबत फ्रॉडची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अॅपलच्या नावाने नकली, बनावट डिव्हाईस विकून ग्राहकांची फसवणूक केल्याचं प्रकार उघड झाले आहेत. अॅपल आयफोन (Apple iPhones)जगभरात विक्री होणारा सर्वात महागडा फोन आहे. अॅपल फोनच्या अधिक किंमती पाहता ग्राहकांचा अनेकदा iPhone च्या जुन्या मॉडेलचा सेल किंवा जुनी मॉडेल खरेदी करण्याकडे अधिक कल असतो. अॅपल डिव्हाईसबाबत दिली जाणारी प्रत्येक डील ग्राहकांसाठी फायद्याचीच ठरेल असं होत नाही. फसवणूक करणारे अनेक फ्रॉडस्टर अॅपल प्रोडक्ट जसं आयफोन, चार्जर किंवा इतर काही वस्तू विकण्यासाठी फेसबुक किंवा इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. अनेकदा व्हॉट्सअॅप किंवा इतर मेसेंजरवर स्वस्त दरात आयफोन देण्याचा दावा करणारे मेसेजही केले जातात. परंतु अशा मेसेजवर, डील्सवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची चौकशी करणं आवश्यक आहे.
Apple ने फ्रॉड्सच्या पडताळणीसाठी तयार केली टीम - जगभरातून आलेल्या तक्रारीनंतर विक्रेत्यांना नकली प्रोडक्टविरुद्ध इशारा देण्यात आला आहे. तसंच विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याचंही सांगण्यात आलं आहे. अॅपलने अशा बनावट प्रोडक्ट्सवर नजर ठेवण्यासाठी एक टीम तयार केली आहे. एका घटनेनंतर या खबरदारी घेतल्या जात आहेत.
सायबरस्पेस रिसर्चर्स एंड्रिया स्ट्रोप्पा यांचा चेहरा फोन चार्ज होताना, आयफोन चार्जरमध्ये झालेल्या स्फोटामुळे जळला. स्ट्रोप्पा यांना या स्फोटानंतर समजलं की, तो अॅपलचा फोन, चार्जर नकली होतं. त्यांनी इन्स्टाग्रामवर एका अनधिकृत चॅनलच्या माध्यमातून तो फोन अॅपल आयफोनच आहे असं समजून खरेदी केला होता.
आयफोन खरा की खोटा कसं ओळखाल? - आयफोन खरेदी करताना नेहमी अॅपल प्रोडक्टच्या सीरियल नंबरला क्रॉस-चेक करणं गरजेचं आहे. हे केवळ अॅपलच्या अधिकृत साईटवरच केलं जावू शकतं. - त्याशिवाय एका खऱ्या आयफोन किंवा Apple प्रोडक्टची IEMI नंबरच्या माध्यमातूनही ओळख केली जावू शकते.