लखनौत भारताचा निसटता पराभव
लखनौ, 6 ऑक्टोबर: भारतीय संघानं कडवी लढत दिल्यानंतरही दक्षिण आफ्रिका लखनौच्या पहिल्या वन डेत सरस ठरली. भारतानं हा सामना 9 धावांनी गमावला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्याचा रिझल्ट टीम इंडियाच्या बाजूनंही लागला असता. पण टीम इंडियाच्या मार्गात काही अडथळे आले आणि तेच भारताच्या पराभवाचं कारण ठरले. पाहूयात टीम इंडियाच्या पराभवाची काही प्रमुख कारणं…
टॉस जिंकल्यानंतर भारतानं दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगचं आमंत्रण दिलं. धवन या वन डेत 5 बॉलर्स घेऊन खेळला. पण आघाडीच्या मोहम्मद सिराज आणि आवेश खान या वेगवॉन बॉलर्सना सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये विकेट काढता आली नाही. 13 व्या ओव्हर्समध्ये शार्दूल ठाकूरनं पहिली विकेट घेतली.
23 व्या ओव्हरमध्ये भारताला चौथी विकेट मिळाली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांऐवजी डेव्हिड मिलर आणि एनरिच क्लासेननं वर्चस्व गाजवलं. या जोडीनं अखेरपर्यंत नाबाद राहताना पाचव्या विकेटसाठी 139 धावा जोडल्या. पुढच्या 17 ओव्हर्समध्ये भारताला एकही विकेट मिळाली नाही.
लखनौ वन डेत भारतीय संघानं तब्बल 4 कॅच सोडले. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सिराज आणि रवी बिश्नोईनं दक्षिण आफ्रिकन बॅट्समनना संधी दिली. त्याचा त्यांनी फायदा उठवला.
250 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. धवन आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी 8 धावातच माघारी परतली. त्यानंतर आलेल्या ईशान किशन आणि पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडला मोठी खेळी करता आली नाही.
हेही वाचा - Ind vs SA ODI: लखनौत टीम इंडिया निसटता पराभव, पण गब्बरचा हा ‘शेर’ ठरला दक्षिण आफ्रिकेवर भारी धवनच्या संघाची कडवी झुंज तरीही धवनच्या या यंग ब्रिगेडचं कौतुक झालं. खुद्द धवननही सहकाऱ्यांच्या खेळीची प्रशंसा केली. कारण या भारतीय संघात धवन सोडल्यास सगळे युवा खेळाडू आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी महत्वाचे शिलेदार ऑस्ट्रेलियाला गेल्यानं धवनच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा जास्त आहे. आणि याच संघानं आज तगड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली लढत दिली. खासकरुन श्रेयस अय्यर (50) आणि संजू सॅमसन (86) यांच्या झुंजार खेळीनं सामन्यात रंग भरला.