JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Asia Cup 2022: भारत की पाकिस्तान… आशियातली सर्वात यशस्वी टीम कोणती?

Asia Cup 2022: भारत की पाकिस्तान… आशियातली सर्वात यशस्वी टीम कोणती?

Asia Cup 2022: भारताची कामगिरी पाकिस्तानपेक्षाही वरचढ आहे. पण तरीही भारत आशियातली सर्वात यशस्वी टीम नाही. आशियातली सर्वात यशस्वी टीम हा मान जातो तो श्रीलंकेकडे.

जाहिरात

आशियातली सर्वात यशस्वी टीम कोणती?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 26 ऑगस्ट**:** रोहित शर्माची टीम इंडिया पुन्हा एकदा एका मोठ्या आव्हानासाठी सज्ज आहे. आशिया चषक स्पर्धेला उद्यापासून यूएईत सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारत आपला पहिला सामना 28 ऑगस्टच्या संध्याकाळी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तानी संघही या महामुकाबल्याआधी पूर्ण तयारी करतोय. गेल्या वर्षी टी20 विश्वचषकात पाकिस्ताननं भारताला 10 विकेट्सनी मात दिली होती. पण आशिया चषकात भारताचं रेकॉर्ड पाकिस्तानपेक्षा कितीतरी पट चांगलं आहे. भारतानं 7 वेळा आशिया चषक पटकावलाय तर पाकिस्ताननं केवळ दोनदाच आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. आणि शेवटचं विजेतेपद मिळवून आता 10 वर्ष लोटली आहेत. आशिया चषक आयोजनाची ही 15वी वेळ आहे. पण आजपर्यंत कधीही भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आशिया चषकाच्या फायनलमध्ये एकदाही आमनेसामने आलेले नाहीत. वन डेत जर दोन पेक्षा अधिक संघांचा समावेश असलेल्या मालिकांमध्ये भारतीय संघ 64 वेळा फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यात 26 वेळा विजेतेपद तर 33 वेळा भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे पाकिस्ताननं 57 वन डे फायनल खेळल्या आहेत. त्यात 25 सामन्यात विजय तर 31 सामन्यात हार स्वीकारावी लागली आहे. टी20त 4-4 फायनल भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ टी20त मात्र तुल्यबळ समजले जातात. मोठ्या स्पर्धांमध्ये उभय संघांनी 4-4 वेळा फायनल खेळल्या आहेत. त्यात दोन्ही संघ 2-2 वेळा विजेतेपदाचे मानकरी ठरले आहेत. यंदाची आशिया चषक स्पर्धाही 20-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जातेय. त्यामुळे यंदा हे पारंपरिक प्रतिस्पर्धी फायनलमध्ये खेळतील अशी अपेक्षा आहे. हेही वाचा - Asia Cup 2022: रशिद खानच्या फिरकीसमोर श्रीलंकेचा निभाव लागणार? सलामीलाच श्रीलंकेसमोर अफगाणिस्तानचं आव्हान श्रीलंका सर्वात यशस्वी भारताची कामगिरी पाकिस्तानपेक्षाही वरचढ आहे. पण तरीही भारत आशियातली सर्वात यशस्वी टीम नाही. कारण श्रीलंकेची आजवरची कामगिरी भारत आणि पाकिस्तानपेक्षाही चांगली आहे. श्रीलंकेनं वन डेत 54 पैकी 29 आणि टी20त 4 पैकी दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. आशिया चषकातही पाच वेळा श्रीलंकेचा संघ विजेता ठरला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान नाही तर श्रीलंका ही वन डे आणि टी20त आशियातली यशस्वी टीम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या