जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Asia Cup 2022: रशिद खानच्या फिरकीसमोर श्रीलंकेचा निभाव लागणार? सलामीलाच श्रीलंकेसमोर अफगाणिस्तानचं आव्हान

Asia Cup 2022: रशिद खानच्या फिरकीसमोर श्रीलंकेचा निभाव लागणार? सलामीलाच श्रीलंकेसमोर अफगाणिस्तानचं आव्हान

श्रीलंका वि. अफगाणिस्तान

श्रीलंका वि. अफगाणिस्तान

Asia Cup 2022: आशिया चषकात श्रीलंका सलामीलाच मैदानात उतरणार आहे. पण लंकेसमोर आव्हान आहे ते अफगाणिस्तानचं. रशिद खान, मोहम्मद नबी, गुरबाझ, झाझाई यांसारख्या टी20तल्या अनुभवी खेळाडूंचा भरणा अफगाणिस्तान संघात आहे. त्यामुळे दुबईत पहिल्याच सामन्यात काँटे की टक्कर अपेक्षित आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दुबई, 26 ऑगस्ट**:** आशियातल्या अव्वल सहा संघांमध्ये उद्यापासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचा सलामीचा सामना उद्या दुबईच्या मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्यात दसुन शनाकाची श्रीलंका मोहम्मद नबीच्या अफगाणिस्तानशी दोन हात करेल. आशिया चषकाचं हे यंदाचं 15वं वर्ष आहे. त्यात पाच वेळा आशिया चषक उंचावणारी श्रीलंका सलामीलाच मैदानात उतरणार आहे. पण लंकेसमोरचं उद्याचं आव्हान सोपं नसेल. कारण रशिद खान, मोहम्मद नबी यांसारख्या टी20तल्या अनुभवी खेळाडूंचा भरणा अफगाणिस्तान संघात आहे. त्यामुळे दुबईत पहिल्याच सामन्यात काँटे की टक्कर अपेक्षित आहे. रशिद खानवर नजर आशिया चषकाच्या सुरुवातीआधीच जसप्रीत बुमरा, शाहीन आफ्रिदी यांसारखे अव्वल गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले. त्यामुळे रशिद खानसारख्या गोलंदाजांवर सध्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. गेली अनेक वर्ष रशिद खान आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह जगातल्या अनेक व्यावसायिक लीगमध्ये वेगवेगळ्या संघांचं प्रतिनिधित्व करतोय. फार कमी वयात त्यानं टी20 क्रिकेटमध्ये मोठी उंची गाठली आहे. त्यामुळे रशिदकडून आफगाणिस्तानला मोठी अपेक्षा आहे. त्याच्यासह कर्णधार मोहम्मद नबी, रहिमतुल्ला गुरबाज, झाझाई, झादरान यांसारखे दर्जेदार खेळाडू अफगाणिस्तानकडे आहेत. श्रीलंका लौकिकास साजेसा खेळ करणार**?** खरं तर यंदा श्रीलंकेत आशिया चषकाचं आयोजन होणार होतं. पण तिथल्या अस्थिर राजकीय वातावरणामुळे एसीसीनं आशिया चषकाचं आयोजन यूएईत करण्याचं ठरवलं. गेल्या 14 आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतानंतर सर्वाधिक 5 वेळा श्रीलंकेनं विजेतेपद मिळवलंय. 2014 साली श्रीलंकेनं पाकिस्तानला हरवून शेवटचं विजेतेपद मिळवलं होतं. पण गेल्या दोन आशिया चषक स्पर्धांमध्ये श्रीलंकेची कामगिरी जेमतेमच राहिली आहे. त्यामुळे आपला लौकिक पुन्हा मिळवण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न राहील.

जाहिरात

श्रीलंकेचा संघ – दसून शनाका (कर्णधार), धनुष्का गुणतिलका, पथुम निसंका, कुशल मेंडिस, चरिता असलंका, भानुका राजपक्षे, ओशेन बंडारा, धनंजय डी सिल्वा, वानिन्दू हसरंगा, महेश तीक्षना, जेफ्री वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशनाका, महीश पथिराना, नुवानीडु फर्नांडो, दिनेश चंडिमल अफगाणिस्तानचा संघ - मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह झादरान, अफसर झाजाई (विकेट कीपर), अजमतुल्लाह ओमरजाई, फरीद अहमद मलिक, फजल हक फारूकी, हशमतुल्लाह शाहिदी, हजरतुल्लाह जजई, इब्राहिम झादरान, करीम जन्नत, मुजीब उर रेहमान, नवीन उल हक, नूर अहमद, रहमानुल्ला गुरबा, राशिद खान, समीउल्लाह शिनवारी, उस्मान गनी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात