JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup: पाकिस्तान हरली पण कुणामुळे? पाहा टी20 वर्ल्ड कप फायनलचा टर्निंग पॉईंट

T20 World Cup: पाकिस्तान हरली पण कुणामुळे? पाहा टी20 वर्ल्ड कप फायनलचा टर्निंग पॉईंट

T20 World Cup: बॉल आणि रन्समधलं अंतर शेवटच्या क्षणी वाढत गेलं. पण मैदानात एक अशी घटना घडली ज्यामुळे पाकिस्तानची या सामन्यावरची पकड सुटली आणि इंग्लंडचा विजय निश्चित झाला.

जाहिरात

काय होता फायनलचा टर्निंग पॉईंट?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेलबर्न, 13 नोव्हेंबर: जोस बटलरच्या इंग्लंडनं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर एक मोठा इतिहास घडवला. आधी वन डे वर्ल्ड कप आणि त्यानंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकणारी इंग्लंड पहिली टीम ठरली. पण फायनलची लढत इंग्लंडसाठी तितकी सोपी नव्हती. इंग्लिश गोलंदाजांनी मेलबर्नच्या मैदानात पाकिस्तानला 137 धावात रोखलं. पण पाकिस्तानी तोफखान्यासमोर हे आव्हानही मोठं होतं. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफनं इंग्लंड संघावर चांगलाच दबाव आणला. त्या दबावात इंग्लंडच्या विकेट्सही गेल्या आणि बॉल आणि रन्समधलं अंतर शेवटच्या क्षणी वाढत गेलं. पण मैदानात एक अशी घटना घडली ज्यामुळे पाकिस्तानची या सामन्यावरची पकड सुटली आणि इंग्लंडचा विजय निश्चित झाला. आफ्रीदीची दुखापत ठरली टर्निंग पॉईंट पाकिस्तानचा लेग स्पिनर शादाब खाननं 13 व्या ओव्हरमध्ये हॅरी ब्रुकची महत्वाची विकेट काढली. ब्रुकचं कॅच लाँग ऑफला उभ्या असलेल्या शाहीन शाह आफ्रिदीनं पकडलं. पण हे कॅच पकडताना त्याला दुखापत झाली. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जाऊन त्यानं प्राथमिक उपचारही घेतले आणि 16 वी ओव्हर टाकण्यासाठी तो मैदानात आला. त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी 30 बॉल्समध्ये 41 रन्स हवे होते. पण या ओव्हरमध्ये फक्त एक बॉल टाकून शाहीन शाह आफ्रिदी पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅचमध्ये हाच टर्निंग पॉईंट ठरला.

हेही वाचा -  Eng vs Pak Final: शमीनं उतरवला पाकिस्तानचा तोरा… अख्तरच्या ट्विटवर म्हणाला, ‘यालाच म्हणतात… इंग्लंडनं बदलला गिअर शाहीन आफ्रीदी बाहेर गेल्याच्या याच संधीचा इंग्लंडनं फायदा घेतला. त्याच ओव्हरमध्ये उरलेले 5 बॉल टाकण्यासाठी आलेल्या इफ्तिकारच्या बॉलिंगवर इंग्लंडनं 13 धावा वसूल केल्या आणि मॅच इंग्लंडच्या पारड्यात गेली.

शाहीन आफ्रिदीनं 2.1 ओव्हरमध्ये 13 धावा देत एक विकेट काढून किफायतशी गोलंदाजी केली होती. पण तो दुखापतीमुळे माघारी परतला आणि पाकिस्तानचा पराभव पक्का झााला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या