JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Eng vs Pak: पाक-इंग्लंड मेगा फायनलसाठी मेलबर्न सज्ज, पण आजच संपणार मॅच? पाहा Weather Report

Eng vs Pak: पाक-इंग्लंड मेगा फायनलसाठी मेलबर्न सज्ज, पण आजच संपणार मॅच? पाहा Weather Report

Eng vs Pak: पाकिस्तान आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आयसीसी टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. पण याच फायनलच्या मुकाबल्याआधी पाऊस आणि मेलबर्नमधलं हवामान चिंतेची बाब ठरु शकतं.

जाहिरात

कसं आहे मेलबर्नमधलं वातावरण?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेलबर्न, 13 नोव्हेंबर: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड सज्ज झालंय यंदाच्या वर्षातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट सामन्यासाठी. आठव्या टी20 वर्ल्ड कपचा फायनलचा मुकाबला थोड्याच वेळात एमसीडीवर सुरु होणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आयसीसी टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघांना दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपची ही ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे. पण याच फायनलच्या मुकाबल्याआधी पाऊस आणि मेलबर्नमधलं हवामान चिंतेची बाब ठरु शकतं. एमसीजीवर पावसाचं सावट आजच्या इंग्लंड आणि पाकिस्तान संघातल्या टी20 वर्ल्ड कप फायनलवर पावसाचं सावट आहे. मेलबर्नमध्ये याआधी तीन सामने पावसामुळे वाया गेले होते. पण फायनलसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेलबर्नमध्ये टॉसवेळी पावसाची शक्यता नाही. भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता टॉस होईल. पण त्यानंतर दोन-अडीच तासांनी पाऊस होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ सामना वेळेत सुरु होणार आहे. पण जर आज पूर्ण सामना झाला नाही तर उर्वरित सामना सोमवारी खेळवण्यात येईल. जर दोन्ही दिवशी पावसानं खेळ वाया गेल्यास संयुक्त विजेते घोषित करण्यात येतील.

टी20 वर्ल्ड कप मेगा फायनल पाकिस्तान वि. इंग्लंड मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वा. स्टार स्पोर्टस नेटवर्क, हॉट स्टारवर थेट प्रक्षेपण पाकिस्तानचा संघ - मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद हॅरीस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, नसीम शाह, हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी इंग्लंडचा संघ - जोस बटलर (कॅप्टन), अॅलेक्स हेल्स, फिल स्टॉल्ट , बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टन, मोईन अली, हॅरी ब्रुक्स, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, आदिल रशीद

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या