मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर
इंदूर, 19 सप्टेंबर**:** मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवताना दिसतोय. वयाच्या 49 व्या वर्षी मास्टर ब्लास्टर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या निमित्तानं इंडिया लीजंड्स संघाचं नेतृत्व करतोय. आज इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकर मैदानात उतरला तेव्हा मैदान सचिन… सचिन… च्या जयघोषानं निनादून गेलं. सचिनची ग्रँड एन्ट्री रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या या सामन्यात न्यूझीलंड लीजंड्स संघानं टॉस जिंकून भारताला बॅटिंग दिली. यावेळी नमन ओझाच्या साथीनं सचिन मैदानात उतरला. तेव्हा इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये फक्त सचिन… सचिन… असा जयघोष सुरु होता. याच जयघोषात सचिनची ग्रँड एन्ट्री झाली.
सचिनच्या फटकेबाजीनं जिंकली प्रेक्षकांची मनं इंदूरच्या मैदानात क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा जुना सचिन पाहायला मिळाला. त्याच्या हूक आणि पूलच्या फटक्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तर काईल मिल्सच्या गोलंदाजीवर सचिनचा फाईन लेगकडे खेळलेला लॅप शॉट डोळ्यांचं पारणं फेडणारा होता. ज्यांनी ज्यांनी हा शॉट पाहिला त्यांना जुना सचिन आठवल्याशिवाय राहणार नाही.
हेही वाचा - Ind vs Aus: टीम सिलेक्शनवेळी रोहितसमोर कोणत्या अडचणी? मोहाली टी20त कशी असेल प्लेईंग XI? पावसाचा व्यत्यय दरम्यान या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानं खेळ थांबवण्यात आला होता. या मालिकेत सचिनच्या इंडिया लीजंड्सनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा आपला पहिला सामना जिंकला होता. तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता.