आयपीएल संग्रहित
मुंबई, 29 ऑगस्ट: रिलायन्स इंडस्ट्रीजची 45वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत 5जी सेवेसंदर्भात अनेक महत्वाचे निर्णय झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी दिल्ली आणि मुंबईत येत्या दिवाळीपर्यंत 5जी सेवा सुरु होणार असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देशात 5जी सेवा सुरु होणार असल्याचं मुकेश अंबानींनी जाहीर केलं. त्याचबरोबर रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनीही जिओ एअर फायबर सेवेची घोषणा केली. या नव्या सेवेमुळे आयपीएलसारख्या सामन्यांचा आनंद तुम्ही घरबसल्या एका वेगळ्या ‘अँगलने’ घेऊ शकता. जिओ एअर फायबर आकाश अंबानी म्हणाले ‘जिओ 5जी चं आणखी एक रुप पाहायला मिळेल ते म्हणजे अल्ट्रा-हाय-स्पीड फिक्स्ड-ब्रॉडबँड. तुम्हाला कोणत्याही वायरशिवाय हवेवर फायबरसारखा वेग मिळत असल्याने आम्ही त्याला JioAirFiber म्हटलं आहे. JioAirFiber सह, तुमचे घर किंवा गीगाबिट-स्पीड इंटरनेटशी जलदपणे कनेक्ट करणं सोपं होणार आहे. आकाश अंबानी पुढे म्हणाले की कंपनीनं JioAirFiber होम गेटवे विकसित केला आहे. जो वायरलेस, सोपा आणि सिंगल डिव्हाइस सोल्यूशन आहे. ते मिळवा, प्लग इन करा, ते चालू करा एवढच असेल. आयपीएल पाहा आता वेगळ्या ‘अँगलने’ जिओ एअर फायबरमुळे आता एकाच वेळी अनेक कॅमेरा अँगलने अनेक व्हिडीओ स्ट्रीम केले जाऊ शकतात तेही अल्ट्रा हाय डेफिनेशननं. आणि कोणत्या अँगलनं पाहायचं हे तुम्ही डायनॅमिकली ठरवू शकता. आता याचा फायदा हा होणार की जिओ यूझर्सना आयपीएलसारखी स्पर्धा पाहताना एक वेगळाच आनंद मिळणार आहे. यूझर्सना घरात बसून एकाच वेळी अल्ट्रा HD कॅमेऱ्यांनी थेट आयपीएल सामना पाहता येणार आहे. आणि यावेळी यूझर्स वेगवेगळ्या अँगल्सनी कॅमेरा स्वीच करुन सामन्याचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे जिओ एअर फायबरच्या मदतीनं घरच्या घरी तुम्ही तुमच्या मित्रांसह आयपीएलदरम्यान स्टेडियमचा फील घेऊ शकणार आहात.