विराट कोहली टॉप टेनमध्ये
मुंबई, 26 ऑक्टोबर: आयसीसी टी20 वर्ल्ड कप ची सुरुवात जोरात झाली आहे. त्यात नुकतच या आठवड्याच्या टी20 रँकिंगही जाहीर करण्यात आली आहे. त्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला मोठा फायदा झाला आहे. पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कप च्या पहिल्याच सामन्यात विराटनं नाबाद 82 धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे विराटनं टी20 बॅट्समनच्या रँकिंगमध्ये टॉप टेन खेळाडूंमध्ये जागा मिळवली आहे. तो सध्या नवव्या स्थानावर आहे. विराटची मोठी झेप आज टी20 रँकिंगमध्ये टॉप टेनमध्ये आलेला विराट ऑगस्ट महिन्यात 35 व्या स्थानावर फेकला गेला होता. कारकीर्दीतल्या खराब फॉर्ममुळे विराटची रँकिंग ढासळली होती. पण आशिया कपनंतर पूर्वीचा विराट पाहायला मिळाला. त्यानं प्रत्येक सामन्यात मोठ्या खेळी केल्या. आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतकही ठोकलं. तो फॉर्मात आला. आशिया कपनंतर वर्ल्ड कपमध्येही त्यानं पहिल्याच सामन्यात त्यानं मोठी खेळी केली तीही पाकिस्तानविरुद्ध आणि ऐन मोक्याच्या क्षणी. त्यामुळे या आठवड्याच्या रँकिंगमध्ये विराट टॉप टेनमध्ये येऊन पोहोचला आहे. या यादीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान पहिल्या क्रमांकावर कायम आहे तर न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा - Ind vs Ned: भारत-नेदरलँड सामना किती वाजता सुरु होणार? आताच पाहून घ्या सामन्याची वेळ! सूर्यकुमारची घसरण टीम इंडियाचा मधल्या फळीतला आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव टी20 च्या ताज्या रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. स्पर्धेआधी तो दुसऱ्या स्थानावर होता. पण आता रिझवाननंतर न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवेनं दुसऱ्या स्थानावर आहे.
विराट पुन्हा नंबर वन होणार? 2016 मध्ये विराट कोहली आयसीसीच्य टी20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला होता. त्यानंतर तो बराच काळ पहिल्या नंबरवर कायम होता. पण 2019 नंतर विराटचा फॉर्म घसरला. आणि तो आयसीसी टी20 रँकिंगमध्ये टॉप टेनमधून बाहेर फेकला गेला होता. पण विराटनं तो मान पुन्हा मिळवला आहे. आणि आता विराट पुन्हा नंबर वनवर येणार का? याचीच उत्सुकता आहे.