कतारमध्ये आयोजित फिफा वर्ल्ड कपमध्ये अमेरिकन पत्रकार ग्रांट वाहल यांचा मृत्यू झाला आहे. एलजीबीटीक्यू समुदायाच्या समर्थनार्थ त्यांनी रेनबो शर्ट घातला होता. यामुळे वाहल यांना कतारमध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. यानतंर काही दिवसांनी पत्रकार ग्रांट वाहल यांचा अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड यांच्यातला सामना कव्हर करत असताना मृत्यू झाला. पत्रकार ग्रांट वाहल यांच्या भावाने या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली आहे. ग्रांट वाहल यांची हत्या केली गेल्याचा आरोप त्यांच्या भावाने केलाय. अमेरिकन पत्रकार ग्रांट हे शुक्रवारी लुसैल आयकॉनिक स्टेडियममध्ये अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड यांच्यातील क्वार्टर फायनल सामन्यावेळी अचानक चक्कर येऊन पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात त्यांनी एलजीबीटीक्यू समुदयाच्या समर्थनार्थ रेनबो टीशर्ट घालून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याला काही काळासाठी ताब्यात घेतलं होतं. कतारमध्ये समलैंगिंक संबंध अवैध आहेत. हेही वाचा : नेमारने केली पेलेंच्या विक्रमाशी बरोबरी, पण ब्राझीलच्या पराभवाने रडवले ग्रांट वाहलने म्हटलं होतं की, वर्ल्ड कप सामन्यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अल रेयानच्या अहमद बिन अली स्टेडियममध्ये प्रवेश दिला नव्हता. रेनबो असलेला टी शर्ट काढण्यासाठी सांगण्यात आलं होतं. इतकंच नाही तर जेव्हा या घटनेबाबात ट्विट केलं तेव्हा फोनही काढून घेण्यात आला होता. ग्रांटच्या भावाने आरोप केला की, कतार सरकारचा माझ्या भावाच्या मृत्यूमागे हात असू शकतो. माझं नाव एरिक वाहल, मी वॉशिंग्टनच्या सिटलमध्ये राहतो. मी ग्रांट वाहलचा भाऊ आहे आणि मी समलैंगिक आहे. माझ्यामुळे माझ्या भावाने वर्ल्ड कपमध्ये रेनबो शर्ट घातला होता. माझा भाऊ निरोगी होता. त्याने सांगितलं होतं की, त्याला धमक्या मिळत होत्या. आता माझा भाऊ जगात नाही यावर माझा विश्वास बसत नाहीय. मला वाटतं की त्याचा खून झालाय. मी मदतीसाठी विनंती करत आहे.