JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Under 19 WC : महिलांचा टी20 वर्ल्ड कप उद्यापासून, भारताची मॅच कधी? जाणून घ्या

Under 19 WC : महिलांचा टी20 वर्ल्ड कप उद्यापासून, भारताची मॅच कधी? जाणून घ्या

यंदाचा अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. यात भारताचा संघ शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जानेवारी: क्रिकेट विश्वात पुरुष क्रिकेट सह महिला क्रिकेट पाहणाऱ्यांमध्येही मोठी वाढ होत आहे. अशातच आता अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपला देखील सुरुवात होत आहे. शुक्रवारी 14 जानेवारी पासून अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार असून यात तब्बल 16 संघानी सहभाग घेतला आहे. खरंतर 2021 मध्येच या वर्ल्ड कपचे आयोजन होणार होते. परंतु कोरोना महामारीमुळे वर्ल्ड कपचे आयोजन काही काळ पुढे ढकलले गेले. यंदाचा अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. यात भारताचा संघ शफाली वर्मा हिच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार असून या  वर्ल्ड कप विषयी क्रीडा रसिकांमध्ये उत्साह आहे. 14 ते 29 जानेवारी या कालावधीत अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कप आयोजित केला असून यात तब्बल 40 हुन अधिक सामने खेळवले जाणार आहेत. हे विविध भागातील मैदानांवर खेळवले जाणार आहेत. या वर्ल्ड कपमध्ये  16 संघांना चार गटात विभागण्यात आले आहे. यातील या गटात बांगलादेश, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, यूएसए या संघांचा सहभाग आहे. तर ब संघात पाकिस्तान, झिम्बाब्वे, रवांडा, इंग्लंड यांचा समावेश आहे. तसेच क संघात वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड, इंडोनेशिया आणि ड संघात भारता सह यूएई, स्कॉटलंड, साऊथ आफ्रिका हे संघ आहेत.

भारताचे सामना केव्हा? 14 जानेवारी रोजी भारताचा सामना ड गटातील प्रतिस्पर्धी साऊथ आफ्रिका संघासोबत होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5:30 ला सुरु होणार असून त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल. त्यानंतर भारताचा दुसरा सामना हा यूएई विरुद्ध 16 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजता होईल. कुठे पहाल सामने : अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपचे लाईव्ह प्रक्षेपण डिझनी हॉट्स स्टारच्या अँपवर दाखवले जाणार आहे. तसेच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपचे सामने पाहता येतील. हे ही पहा :  IND Vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध टी२०मध्ये कुणाला मिळणार संधी? ‘या’ खेळाडूंचा होणार पत्ता कट अंडर 19 भारतीय महिला संघ : शफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हृषिता बसू (विकेटकीपर), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा, तीतस साधू, फलक नाज, शबनम एम.डी. राखीव खेळाडू: शिखा, नजला सीएमसी, यशश्री.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या