केरळमध्ये टीम इंडियाच्या चाहत्यांची झालेली गर्दी
तिरुअनंतरपुरम, 26 सप्टेंबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातल्या टी20 मालिकेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी आज भारतीय संघ हैदराबादवरुन थेट केरळमध्ये दाखल झाला. केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये पाहुण्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली टी20 खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी तिरुअनंतपुरममध्ये पोहोचताच टीम इंडिया हॉटेलकडे रवाना झाली. पण त्यावेळी केरळच्या रस्त्यांवर हजारो क्रिकेट फॅन्स भारतीय संघाच्या स्वागताला उपस्थित होते. रोहितला पाहण्यासाठी तुफान गर्दी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं केरळमधल्या क्रिकेट चाहत्यांचं हे प्रेम आपल्या मोबाईलमध्ये टिपलं. त्यावेळी बसमध्ये बसलेल्या रोहितला आणि इतर खेळाडूंना पाहण्यासाठी बसच्या बाहेर तुफान गर्दी पाहायला मिळाली. आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी हे फॅन्स प्रयत्न करत होते. यावेळी पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
भारतीय संघात बदल दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेआधी भारतीय संघात ऐनवेळी बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू दीपक हुडाला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी मुंबईकर श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान मिळालंय. तर हार्दिक पंड्याच्या जागी डावखुऱ्या शाहबाज अहमदला संधी देण्यात आली आहे.
उमेश यादव संघासोबत कायम दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या जागी उमेश यादवचा संघात ऐनवेळी समावेश करण्यात आला होता. तीन सामन्यांच्या त्या मालिकेत मोहाली टी20त उमेशला अंतिम अकरातही जागा मिळाली होती. तोच उमेश यादव आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही संघासोबत कायम असणार आहे. कारण मिळालेल्या माहितीनुसार शमी अजूनही कोरोतून बरा झालेला नाही. त्यामुळे त्याच्याजागी उमेश यादव संघात कायम राहणार आहे. भारत वि. दक्षिण आफ्रिका टी20 मालिका पहिला टी20 सामना – 28 सप्टेंबर, त्रिवेंद्रम दुसरा टी20 सामना – 2 ऑक्टोबर, गुवाहाटी तिसरा टी20 सामना – 4 ऑक्टोबर, इंदूर हेही वाचा - Cricket: ‘त्या’ रन आऊटबाबत दिप्ती शर्मानं केला खुलासा, भारतात पोहोचताच दिप्ती म्हणाली… भारत वि. दक्षिण आफ्रिका वन डे मालिका पहिला वन डे सामना – 6 ऑक्टोबर, रांची दुसरा वन डे सामना – 9 ऑक्टोबर, लखनौ तिसरा वन डे सामना – 11 ऑक्टोबर, दिल्ली टी20 मालिकेतले सर्व सामने हे संध्याकाळी 7.00 वाजता तर वन डे मालिकेतील सामने दुपारी 1.30 वाजता सुरु होतील. या सामन्यांचं प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने हॉटस्टारवरुन केलं जाणार आहे.