सरावावेळी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित
दुबई, 3 सप्टेंबर**:** आशिया चषकात सलग दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. साखळी फेरीत भारतानं पाकिस्तानचा 5 विकेट्सनी पराभव केला होता. आता सुपर फोरमध्ये हे दोन संघ पुन्हा एकदा भिडणार आहेत. त्यामुळे दुबईच्या मैदानात आणखी एका हाय व्होल्टेज मुकाबल्याची पर्वणी चाहत्यांना मिळणार आहे. जाडेजा आऊट, अक्षर इन आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा खेळताना दिसणार नाही. साखळी फेरीत हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात जाडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्याजागी बीसीसीआयनं अक्षर पटेलचा संघात समावेश केला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत तो अंतिम अकरात खेळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनियरनंतर पाकचा युवा गोलंदाज शाहनवाझ दहानीदेखील दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे आगामी लढतीत तो खेळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. महामुकाबल्याआधी कसून सराव रविवारच्या लढतीआधी टीम इंडियाला बराच मोकळा वेळ मिळाला. या वेळात भारतीय खेळाडूंनी दुबईच्या समुद्रकिनारी मजा मस्तीही केली. पण नंतरच्या दोन दिवसात टीम इंडियानं कसून सरावही केला.
दरम्यान आशिया चषकाच्या सुरुवातीलाच खेळाडूंच्या दुखापतींनी भारतीय संघव्यवस्थापनाला सतावलं होतं. स्पर्धेआधी जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे संघाबाहेर गेले. तर साखळी फेरीनंतर रवींद्र जाडेजाही जायबंदी झाला. आणि आता वेगवान गोलंदाज आवेश खानच्या तब्येतीबाबत एक माहिती समोर आली आहे. टीम इंडियाच्या सराव सत्रात आवेश खान सहभागी झाला नाही. तब्येत ठीक नसल्यानं तो सरावासाठी मैदानात उतरला नसल्याचं प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितलं. पण सामन्याआधी तो बरा होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महामुकाबल्यासाठी संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल हेही वाचा - IPL 2023: पंजाब किंग्सचं नशीब आता तरी फळफळणार? विश्वविजेत्या संघाचे कोच पंजाबच्या ताफ्यात **भारत वि. पाकिस्तान, दुसरा सामना, सुपर-**4 रविवार, संध्याकाळी 7.30 वा. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम हॉटस्टार आणि स्टार स्पोर्टसवर थेट प्रक्षेपण