JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / भारताचं हॉकी वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न धुळीला

भारताचं हॉकी वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न धुळीला

भारतीय संघाने स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी कडवी झुंज दिली. परंतु अखेर भारताचा हॉकी विश्वचषक 2023 चा प्रवास संपला, आणि 48 वर्षांनंतर पदक जिंकण्याचे त्याचे स्वप्नही भंगले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जानेवारी : भारतातील ओडिशा येथे होत असलेल्या पुरुष हॉकी वर्ल्ड कपमधील भारताचं आव्हान आता संपुष्टात आलं आहे. रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या क्रॉस ओव्हर सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. क्रॉस ओव्हर सामन्यात  60 मिनिटांपर्यंत दोन्ही संघांमधील सामना 3-3 असा बरोबरीत राहिला. होता मात्र पेनल्टी शूट आऊटमध्ये न्यूझीलंडने 5-4 ची आघाडी घेतली. भारताकडून या सामन्यात ललित उपाध्याय, वरुण कुमार आणि सुखजित सिंग यांनी गोल केले.

भारतीय संघाचे गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि क्रिशन पाठक यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये एकूण चार सेव्ह केले. भारतीय संघाने स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी कडवी झुंज दिली परंतु अखेर भारताचा हॉकी विश्वचषक 2023 चा प्रवास संपला, आणि 48 वर्षांनंतर पदक जिंकण्याचे त्याचे स्वप्नही भंगले.   हे ही वाचा  : गजनी हिटमॅन! टॉसचा निर्णय तर सोडाच मैदानात ‘ही’ गोष्ट देखील विसरला होता रोहित भारतीय हॉकी संघ हा क्रॉस ओव्हर सामना सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र न्यूझीलंड संघाने जबरदस्त पुनरागमन केले. न्यूझीलंडने सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर दोन गोल करून बरोबरी साधली आणि नंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या