पाकिस्तानला हरवून श्रीलंका फायनलमध्ये
सिल्हेट-बांगलादेश, 13 ऑक्टोबर: महिलांच्या आशिया कप स्पर्धेत आज सेमी फायनलच्या लढती पार पडल्या. अपेक्षेप्रमाणे भारतीय संघानं थायलंडला हरवून सलग आठव्यांदा आशिया कप स्पर्धेची फायनल गाठली. सहा वेळा आशिया कप जिंकणाऱ्या भारताला थायलंडला हरवणं फार अवघड गेलं नाही. पण श्रीलंका आणि पाकिस्तान संघातली दुसरी सेमी फायनल मात्र चुरशीची झाली. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेनं अवघ्या एका धावेनं श्रीलंकन संघानं बाजी मारली आणि पाचव्यांदा स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. 2008 नंतर श्रीलंका पहिल्यांदाच फायनलमध्ये वुमन्स आशिया कपमध्ये श्रीलंकेचा सुरुवातीला चांगलाच दबदबा होता. 2004, 2005, 2006 आणि 2008 सालची आशिया चषक फायनल भारत आणि श्रीलंका याच दोन संघांमध्ये रंगली होती. पण श्रीलंकेला प्रत्येकवेळी उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर 2012, 2016 आणि 2018 सालच्या आशिया कपमध्ये श्रीलंका फायनलआधीच गारद झाली. पण तब्बल 14 वर्षांनी श्रीलंकन महिला संघ पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहोचला आहे. म्हणूनच पाकिस्तानवरचा विजय श्रीलंकेसाठी खास ठरला. आणि त्यानंतर मैदानातच श्रीलंकेच्या खेळाडूंनी या विजयानंतर Victory Dance केला. श्रीलंका क्रिकेटनं याचा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. सोशल मीडियात आणि अवघ्या क्रिकेट वर्तुळात त्याची चांगलीच चर्चा आहे.
रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेचा विजय दरम्यान श्रीलंका आणि पाकिस्तान संघातला दुसरा सामना सेमी फायनलचा सामना चांगलाच रंगला. श्रीलंकेनं दिलल्या 123 धावांचा पाठलाग करताना पाकिस्ताननं 19 व्या ओव्हरपर्यंत 6 बाद 114 धावांची मजल मारली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 9 धावा हव्या असताना पाकिस्तानची ऑल राऊंडर निदा दार पीचवर होती. त्यामुळे पाकिस्तान जिंकेल अशी परिस्थिती होती. पण अखेर श्रीलंकेनं अवघ्या एका रन्सनं बाजी मारली आणि फायनलमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा - Womens IPL: ठरलं… पुढच्या वर्षी या महिन्यात होणार वुमन्स IPL; पाहा BCCI च्या नव्या अध्यायाची संपूर्ण माहिती भारत-श्रीलंका फायनल आता शनिवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. बांगलादेशच्या सिल्हेट आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शनिवारी दुपारी 1.00 वाजता उभय संघात आशिया कपची ही मेगा फायनल पार पडेल. महत्वाची बाब म्हणजे यंदाच्या आशिया कपममध्ये साखळी सामन्यात भारतानं श्रीलंकेला मात देत स्पर्धेची विजयी सुरुवात केली होती. त्यामुळे टीम इंडिया शनिवारी सातव्यांदा आशिया कप जिंकणार की श्रीलंका स्पर्धेतलं पहिलं विजेतेपद पटकावून पुन्हा Victory Dance करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.