मुंबई, 13 ऑक्टोबर: गेली अनेक वर्ष भारतात महिला आयपीएलची चर्चा रंगतेय. पण बीसीसीआयची ही योजना प्रत्यक्षात उतरली नव्हती. पण आता याबाबत बीसीसीआयनं सकारात्मक पावलं टाकायला सुरुवात केली आहे आणि आता वुमन्स आयपीएलची फार वाट पाहावी लागणार नाही. कारण पुढच्या वर्षी बीसीसीआय वुमन्स आयपीएल खेळवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. फेब्रुवारीत होणाऱ्या टी20 वर्ल्डनंतर वुमन्स आयपीएल आयोजित करण्याचा घाट बीसीसीआयनं घातला आहे. मार्च 2023 मध्येच या स्पर्धेचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. काय आहे BCCI चा प्लॅन? वुमन्स आयपीएलमध्ये 5 संघांमध्ये 22 सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा प्लॅन आहे. त्यासाठी 6 परदेशी खेळाडूंसह 18 जणांचा एक संघ बनवण्यात येईल. प्लेईंग इलेव्हनमध्ये जास्तीत जास्त 5 परदेशी खेळाडू खेळवता येतील. या पाच पैकी 4 खेळाडू आयसीसीच्या पूर्ण सदस्य असलेल्या संघातील असतील. तर 1 खेळाडू असोसिएट संघातला सदस्य असेल. एक टीम प्रत्येक टीमसोबत 2 दोन सामने खेळेल. अव्वल स्थानी राहिलेल्या टीमला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरच्या टीममध्ये एलिमिनेटरचा सामना होईल.
According to the reports,
— Female Cricket (@imfemalecricket) October 13, 2022
BCCI is planning to have five teams for the inaugural season of Women's IPL. #CricketTwitter pic.twitter.com/DV9HEvjYoh
कधी होणार स्पर्धा 26 फेब्रुवारीला महिलांच्या टी20 वर्ल्ड कपची फायनल होणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यात वुमन्स आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. दरम्यान पुरुषांच्या आयपीएलआधी स्पर्धा संपवण्याचा प्रयत्न राहील. होम-अवे फॉरमॅट मध्येही ही स्पर्धा खेळवण्याचा विचार सुरु आहे. हेही वाचा - T20 World Cup: टी20 वर्ल्ड कपआधी पाहा टीम इंडियाची काय झाली परिस्थिती? या ज्युनियर संघाचा भारताला दणका कसा होणार लिलाव? याआधी बीसीसीआयनं आयपीएलच्या धर्तीवर तीन संघांमध्ये वुमन्स टी20 चॅलेंजचं आयोजन केलं होतं. पण यंदा पाचही टीम्ससाठी फ्रँचायझीचा शोध घेतला जाईल. देशातल्या प्रत्येक झोनमधून त्यासाठी एका फ्रँचायझीची निवड केली जाईल. त्यात नॉर्थ झोनमध्ये जम्मू आणि धर्मशाला, वेस्ट झोनमध्ये पुणे आणि राजकोट, सेंट्रल झोनमध्ये इंदूर, नागपूर आणि रायपूर, ईस्ट झोनमध्ये रांची आणि कटक, साऊथ झोनमध्ये कोची आणि विशाखापट्टणम तर नॉर्थ ईस्ट झोनमध्ये गुवाहाटी या शहरांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय बीसीसीआयचा दुसरा प्लान हा आहे की होम बेस सामने खेळवण्यापेक्षा अहमदाबाद, बंगलुरु, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये होणार आयोजित केले जावे. या सगळ्या मुद्द्यांवर 18 ऑक्टोबरला होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल अध्यक्ष आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसमोर अंतिम निर्णय घेतले जातील.