त्या कसोटीत मॅच फिक्सिंग?
मुंबई, 24 नोव्हेंबर: जुलै महिन्यात झालेली पाकिस्तान वि. श्रीलंका कसोटी मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. श्रीलंकन संसदेतील एका खासदारानं बुधवारी या मालिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. इतकच नव्हे तर एका सामन्यात मॅच फिक्सिंगचा आरोप झाल्याचाही आरोप केला होता. त्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डानं अशा आरोपांमुळे मलीन होणारी प्रतिमा लक्षात घेता आयसीसीकडे याविषयी चौकशी करण्याची विनंती केली आहे. त्यासाठी आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी समितीचे अध्यक्ष अॅलेक्स मार्शल यांच्याकडे दाद मागण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? पाकिस्तानचा संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यातल्या पहिल्याच कसोटीत श्रीलंकेनं 342 धावांचं आव्हान देऊनही पाकिस्ताननं ते आरामात गाठलं होतं. त्यामुळे गॉलमध्ये झालेल्या या कसोटीत मॅच फिक्सिंगचा संशय श्रीलंकन संसदेतील एक खासदार नलिन बंदारा यांनी व्यक्त केला होता. पीचवर रोलर चालवणाऱ्या व्यक्तीपासून ते अनेकांनी पैसे घेतल्याचा आरोपही करण्यात आला होता. पण याप्रकरणात त्यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.
हेही वाचा - Ind vs NZ: भारत-न्यूझीलंड वन डे पाहण्यासाठी सकाळी ‘हा’ अलार्म करा सेट… पाहा किती वाजता सुरु होणार मॅच? श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची प्रतिक्रिया… यावर श्रीलंकन क्रिकेट बोर्डानं संबंधित खासदार महाशय श्रीलंकन क्रिकेटची प्रतिमा मलीन करत असल्याचं म्हटलं आहे. अशा प्रकारे जाहीरपणे आरोप करणं चुकीचं आहे. पण श्रीलंकन क्रिकेट बोर्ड याप्रकरणात आयसीसीची मदत घेणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यानं आयसीसीनं मात्र अजून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.