दक्षिण आफ्रिका सराव सामन्यात विजयी
ब्रिस्बेन, 17 ऑक्टोबर: भारत-ऑस्ट्रेलियासह दुसरीकडे आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघातही सराव सामना पार पडला. भारत दौऱ्यात टी20 मालिका गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेनं वॉर्म मॅचमध्ये मात्र कमाल केली. गेल्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये उपविजेते ठरलेल्या न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेनं 9 विकेट्सनी धुव्वा उडवला. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडला अवघ्या 98 धावात गुंडाळलं. त्यानंतर रायली रुसोच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं हा सामना 9 विकेट्स राखून जिंकला. महाराज-शम्सी प्रभावी दक्षिण आफ्रिकेकडून या सामन्यात दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यामुळे न्यूझीलंडला 100 धावांचा पल्लाही गाठता आला नाही. खासकरुन दक्षिण आफ्रिकेचे आघाडीचे स्पिनर्स केशव महाराज आणि तबरेज शम्सीनं किवी फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. महाराजनं 17 धावात 3 तर शम्सीनं 6 धावात 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय पार्नेलनं 2 तर यान्सन, रबाडा आणि मारक्रमनं 1-1 विकेट घेतली. 7 बॅट्समनी केल्या फक्त 10 धावा न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टीलनं सर्वाधिक 26 धावा केल्या. तर ग्लेन फिलिप (20) आणि मिचेल ब्रेसवेल (11) या दोघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. पण न्यूझीलंडचे 8 बॅट्समन 10 धावांच्या आतच गारद झाले. त्यामुळे किवी संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यानंतर रिझा हेंड्रिक्स आणि रुसोनं 66 धावांची सलामी दिली. हेंड्रिक्स 27 धावा काढून बाद झाला. पण रुसोनं नाबाद 53 धावांची खेळी करुन दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.
हेही वाचा - T20 World Cup: टीम इंडिया है तय्यार! प्रॅक्टिस मॅचमध्ये राहुलनं केला हा कारनामा, सूर्याही चमकला दक्षिण आफ्रिका-भारत एकाच गटात दरम्यान सुपर 12 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत एकाच गटात आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर पाकिस्तानसह दक्षिण आफ्रिकेचंही मोठं आव्हान असेल. भारताच्या या गटात पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे संघ आहेत. तर क्वालिफाईंग सामन्यानंतर आणखी दोन संघ भारताच्या गटात दाखल होतील.