JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सारासोबत डेटिंगच्या चर्चांवर शुभमन गिले सोडलं मौन, म्हणाला..,.

सारासोबत डेटिंगच्या चर्चांवर शुभमन गिले सोडलं मौन, म्हणाला..,.

सारा अली खानने अगदी कमी कालावधीत बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आपलं नाव कमावलं आहे. सारा तिच्या अभिनयासोबतच तिच्या लव्ह लाईफमुळेही खूप चर्चेत असते.

जाहिरात

सारा अली खान, शुभमन गिल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 नोव्हेंबर : आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी स्टार किड अभिनेत्री सारा अली खान तिच्या हटके अंदाजामुळे कायमच प्रकाश झोतात असते. अगदी कमी कालावधीत तिने बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आपलं नाव कमावलं आहे. सारा तिच्या अभिनयासोबतच तिच्या लव्हलाईफमुळेही खूप चर्चेत असते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून सारा अली खान क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट केलं आहे. अशातच आता सारासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर आता शुभमन गिलने मौन सोडलं आहे. प्रीती आणि नीती सिमोज यांचा लोकप्रिय पंजाबी चॅट शो ‘दिल दिया गल्ला’ मध्ये शुभमन गिलने नुकतीच हजेरी लावली होती. हा शो सोनम बाजवा होस्ट करत आहे. शोमध्ये क्रिकेटरला विचारण्यात आले की बॉलिवूडमधील सर्वात योग्य महिला अभिनेत्री कोण वाटते? यावर क्षणाचाही विलंब न करता शुभमन सारा अली खानचं नाव घेतो. त्यानंतर सोनम विचारते तू सारा अली खानला डेट करतोयेस का? यावर शुभमन म्हणतो ‘कदाचित’. जेव्हा सोनम साराविषयी खरं सांगायला लावते तेव्हा शुभमन लाजतो आणि म्हणतो साराचं सारं खरं सांगितलं. कदाचित हो कदाचित नाही. शुभमनने साराला डेट करण्याविषयी हो ही म्हटलं नाही आणि नाही देखील म्हटलं नाही. त्यामुळे दोघांचे चाहतेही आता संभ्रमात पडले आहेत नक्की दोघांचं चाललंय काय? हेही वाचा -  सारा-शुभमनचं नक्की काय चाललंय?; डेटिंगच्या बातम्यांदरम्यान पुन्हा नवा VIDEO व्हायरल बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांचा हॉटेलमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शुभमन आणि साराला दुबईमध्ये डिनर करताना एकत्र स्पॉट केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. शुभमनच्या पहिले साराचं नाव कार्तिक आर्यनसोबत जोडलं गेलं होतं.

दरम्यान, आता शुभमनच्या या उत्तरानंतर सगळ्यांचं लक्ष साराकडे लागलं आहे की, यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या