जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सारा-शुभमनचं नक्की काय चाललंय?; डेटिंगच्या बातम्यांदरम्यान पुन्हा नवा VIDEO व्हायरल

सारा-शुभमनचं नक्की काय चाललंय?; डेटिंगच्या बातम्यांदरम्यान पुन्हा नवा VIDEO व्हायरल

सारा अली खान, शुभमन गिल

सारा अली खान, शुभमन गिल

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांचा हॉटेलमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर दोघांविषयी सगळीकडे एकच चर्चा पहायला मिळत आहे. अशातच त्यांचे दोन व्हिडिओ समोर आले ज्यात सारा आणि शुभमन एका हॉटेलमधून बाहेर पडताना आणि नंतर फ्लाइटमध्ये एकमेकांच्या शेजारी बसताना दिसत आहे. सध्या या व्हिडीओनं सगळयांचं लक्ष वेधलंय. पहिल्या व्हिडिओमध्ये सारा गुलाबी रंगाचा टँक टॉप घालून हॉटेलच्या लॉबीमधून बाहेर पडताना दिसत आहे. ती बाहेर पडताच, कॅमेरा दुसऱ्या एका व्यक्तीवर जातो ती व्यक्ती शुभमन असल्याचा तर्क सोशल मीडियावर लावला जात आहे.

जाहिरात

दुसऱ्या व्हिडीओमध्ये सारा आणि शुभमन यांना फ्लाइटमध्ये एकत्र पाहिल्याचा दावा केला जात आहे. सारा फ्लाइटमध्ये चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसते आणि नंतर तिच्या सीटवर जाते. त्यामुळे व्हिडीओमध्ये सारासोबत असणारा व्यक्ती शुभमन असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. एका यूजरने ट्विटरवर लिहिले की, ‘कदाचित मी चुकीचा असू शकतो पण शुभमन आणि सारा एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत’.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघांनाही दुबईमध्ये डिनर करताना एकत्र स्पॉट केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. शुभमनच्या पहिले साराचं नाव कार्तिक आर्यनसोबत जोडलं गेलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात