शुभमन गिल
मुंबई, 17 सप्टेंबर: आयपीएलच्या 15व्या मोसमात बीसीसीआयनं दोन नव्या संघांचा समावेश केला होता. त्यापैरकी एक होती लखनौ सुपरजायंट्स तर दुसरी होती गुजरात टायटन्स. यापैकी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातनं यंदाच्या आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. पहिलीच आयपीएल स्पर्धा खेळणाऱ्या या संघानं कमाल केली आणि फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सवर मात केली. या स्पर्धेत गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलनं मोलाचं योगदान दिलं. पण याच गिलनं आता गुजरात टायटन्स संघ सोडला का? असा प्रश्न उपस्थित होतोय. याचं कारण आहे गुजरात फ्रँचायझीनं केलेला एक ट्विट. गुजरात टायटन्सचं ट्विट आणि चर्चा आज संध्याकाळी 3 वाजून 57 मिनिटांनी गुजरात टायटन्सनं एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये फ्रँचायझीनं, तुझा हा प्रवास अविस्मरणीय होता. भविष्यासाठी तुला शुभेच्छा.’ असं शुभमन गिलला म्हटलं आहे. त्यावर गिलनंही काही इमोजी शेअर करत रिप्लाय दिला आहे. त्यामुळे गिलनं खरंच गुजरात फ्रँचायझीला गुडबाय केलं आहे? की एखाद्या प्रमोशनल इव्हेंटचा हा हिस्सा आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
हेही वाचा - Shubman Gill: शुभमन गिलनं गुजरात टायटन्सला केलं गुडबाय? GT फ्रँचायझीचं ट्विट Viral IPL 2022 मध्ये दमदार प्रदर्शन आयपीएलच्या गेल्या मोसमात 23 वर्षांच्या शुभमन गिलनं 16 सामन्यात तब्बल 483 धावा फटकावल्या होत्या. त्यात 4 अर्धशतकांचाही समावेश होता. त्याआधी 2018 साली त्यानं वयाच्या 19व्या वर्षी आयपीएल पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्यानं 74 आयपीएल सामन्यांमध्ये 32 च्या सरासरीनं 14 अर्धशतकांसह 1900 धावा केल्या आहेत.