JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Sara Tendulkar: रक्षाबंधनाआधीच सारा तेंडुलकरला अर्जुननं दिलं खास गिफ्ट!

Sara Tendulkar: रक्षाबंधनाआधीच सारा तेंडुलकरला अर्जुननं दिलं खास गिफ्ट!

Sara Tendulkar: सारानं रक्षाबंधनापूर्वी तिला मिळालेल्या गिफ्टबाबत इन्स्टाग्राम पोस्टमधून खुलासा केला आहे. आणि हे खास गिफ्ट दिलंय तिचा लहान भाऊ अर्जुन तेंडुलकरनं.

जाहिरात

सारा आणि अर्जुन तेंडुलकर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई. 10 ऑगस्ट**:** मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या प्रत्येक पोस्टची नेहमी चर्चा होते. आणि त्यावर चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रियाही आणि लाईक्सही मिळतात. उद्या रक्षाबंधन आहे आणि याच पार्श्वभूमीवर सारानं तीन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक फोटो सध्या ट्रेन्ड होतोय. साराला मिळालं रक्षाबंधनाचं गिफ्ट सारानं रक्षाबंधनापूर्वी तिला मिळालेल्या गिफ्टबाबत इन्स्टाग्राम पोस्टमधून खुलासा केला आहे. आणि हे खास गिफ्ट दिलंय तिचा लहान भाऊ अर्जुन तेंडुलकरनं. अर्जुननं साराला एक खास हॅन्डबॅग गिफ्ट केली आहे. याच हॅन्डबॅगसोबतचा एक फोटो सारानं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि त्याखाली रक्षाबंधनाआधीच दिलेल्या या खास गिफ्टसाठी ‘थँक्य यू’ म्हटलंय.

संबंधित बातम्या

हेही वाचा - मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूनं उचललं मोठं पाऊल, क्रिकेटमधून संन्यास घेणार? लाईक्स-कमेंटचा पाऊस साराचे इन्स्टाग्रामवर तब्बल 2.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिच्या या पोस्टवरही यूझर्सनी भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स दिल्या. आतापर्यंत तिच्या या रक्षाबंधन स्पेशल पोस्टला तब्बल तीन लाखांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर हजारो जणांनी कमेंट्सही केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या