शिवा सिंगच्या बॉलिंगवर ऋतुराजनं ठोकले 7 सिक्स
अहमदाबाद, 28 नोब्हेंबर: महाराष्ट्राचा युवा फलंदाज आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडनं विजय हजारे करंडकात उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात तब्बल 220 धावांची खेळी केली. पण ऋतुराजच्या या खेळीपेक्षा चर्चा झाली ती त्यानं 49व्या ओव्हरमध्ये केलेल्या एका कारनाम्याची. ऋतुराजनं या ओव्हरमध्ये तब्बल 7 सिक्सर्स ठोकले. एका नो बॉलमुळे ऋतुराजला आणखी एक बॉल त्या ओव्हरमध्ये मिळाला. आणि त्याही बॉलवर सिक्सर ठोकून ऋतुराज मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये सात सिक्स ठोकणारा जगातला पहिला फलंदाज ठरला. पण ही कामगिरी त्यानं ज्या बॉलरविरुद्ध केली तो बॉलर आहे तरी कोण? शिवा सिंगची महागडी ओव्हर ऋतुराजनं उत्तर प्रदेशचा लेफ्ट आर्म स्पिनर शिवा सिंगविरुद्ध ही विक्रमी कामगिरी केली. पण 23 वर्षांचा शिवा सिंग हा उत्तर प्रदेशच्या अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे. कारण 2018 साली त्यानं विजय हजारे ट्रॉफीमधूनच लिस्ट ए करीअरची सुरुवात केली होती. इतकच नव्हे तर तो भारताकडून त्याच वर्षी अंडर-19 वर्ल्ड कपदेखील खेळला. हेही वाचा - Virat Kohli: खरंच विराट रिटायर्ड होणार? विराटची ‘ती’ पोस्ट पाहून चाहत्यांच्या काळजात झालं धस्स! 2018 साली अॅक्शनमुळे चर्चा 2018 साली शिवा सिंगची गोलंदाजीची शैली अनोखी होती. याच शैलीमुळे तो चर्चेत आला होता. पण बीसीसीआयनं त्याच्या या शैलीवर आक्षेप घेतला. त्यानंतर त्यानं आपली बॉलिंग अॅक्शन सुधारली.
दरम्यान शिवा सिंगनं आतापर्यंत 6 लिस्ट ए सामन्यात 5 तर 15 टी20 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. ऋतुराजचा वर्ल्ड रेकॉर्ड दरम्यान शिवा सिंगला 7 सिक्स ठोकून ऋतुराजनं वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. वन डे आणि टी20 क्रिकेटमध्ये याआधी हर्षल गिब्ज, युवराज सिंग, कायरन पोलार्डसारख्या दिग्गज खेळाडूंनी एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकले होते. पण आज ऋतुराजनं त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकलं.
या विक्रमी कामगिरीसह त्यानं 159 बॉलमध्ये 220 धावांची खेळीही केली. त्यात 10 फोर आणि तब्बल 16 सिक्सर्सचा समावेश होता.