मुंबई, 27 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर रोहित शर्मा, विराट कोहली, रवीचंद्रन अश्विन आणि दिनेश कार्तिकसारख्या सिनियर खेळाडूंसाठी हा शेवटचा वर्ल्ड कप ठरला असं मानलं जात आहे. त्यातच विराट कोहलीनं नुकतीच एक पोस्ट केली आणि या पोस्टनंतर अनेकांना विराट खरंच रिटायर्ड होतोय का? असा प्रश्न पडला.
विराटच्या त्या पोस्टची चर्चा
विराटनं काल ट्विटरवर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यानं 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या त्या अविस्मरणीय खेळीचा उल्लेख केला होता. याच पोस्टनंतर विराट रिटायर्ड होतोय का? अशा चर्चा सुरु झाल्या.
October 23rd 2022 will always be special in my heart. Never felt energy like that in a cricket game before. What a blessed evening that was 💫🙏 pic.twitter.com/rsil91Af7a
— Virat Kohli (@imVkohli) November 26, 2022
पाकिस्तानविरुद्ध विराटची सर्वोत्तम खेळी
विराटनं 23 ऑक्टोबरला विराट कोहलीनं पाकिस्तानविरुद्ध 82 धावांची खेळी केली होती. याच खेळीमुळे टीम इंडियानं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टी20 वर्ल्ड कपच्या सलामीच्या सामन्यात सनसनाटी विजय साजरा केला होता. त्या वर्ल्ड कपमध्ये विराटनं सर्वाधिक धावा ठोकल्या होत्या.
हेही वाचा - Ind vs NZ ODI: न्यूझीलंड 1, भारत 1, पाऊस 2… भारत-न्यूझीलंड मालिकेत पावसानं केला 'हा' रेकॉर्ड
विराटचा शेवटचा वर्ल्ड कप?
विराट कोहली सध्या 34 वर्षांचा आहे. पुढच्या टी20 वर्ल्ड कपपर्यंत विराट 36 वर्षांचा होईल. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. टी20 साठी युवा टीम इंडिया 2024 च्या टी20 वर्ल्ड कपसाठी मैदानात उतरवण्याचा बीसीसीआयचा प्लॅन आहे. त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरु झाली आहे. त्यामुळे विराट कोहली पुढच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? हे येणारा काळच ठरवेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports, Virat, Virat kohli