दुसऱ्या वन डेतून ऋतुराज, बिश्नोईला वगळलं
रांची, 9 ऑक्टोबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातल्या दुसऱ्या वन डेत टीम इंडियाचा कॅप्टन शिखर धवननं दोन बदल केले. त्यानं टॉसवेळी संघातल्या या बदलांची माहिती दिली आणि त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिखर धवननं शाहबाज नदीम आणि वॉशिंग्टन सुंदरला संघात जागा दिली. पण त्याऐवजी त्यानं लखनौ वन डेत पदार्पण करणाऱ्या दोन्ही खेळाडूंचा पत्ता कट केला. त्यामुळे केवळ एक मॅचसाठी या दोघांना संधी देऊन बीसीसीआयनं या खेळाडूंवर अन्याय केला असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. ऋतुराज-बिश्नोईला विश्रांती लखनौच्या पहिल्या वन डेत ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या दोन युवा खेळाडूंनी भारताच्या वन डे संघात पदार्पण केलं होतं. गेल्या अनेक दौऱ्यात पदार्पणाच्या सामन्याची वाट पाहणाऱ्या ऋतुराजला लखनौत भारताची वन डे कॅप मिळाली. ऋतुराजनं त्या सामन्यात 19 धावांची खेळी केली. तर रवी बिश्नोईनं गोलंदाजीत 8 ओव्हर्समध्ये 69 धावा मोजून केवळ 1 विकेट काढली होती. पण पदार्पणाचा सामना खेळून पुढच्याच सामन्यात या दोघांनाही ड्रेसिंग रुममध्ये बसावं लागलं आहे. दरम्यान ऋतुराज गायकवाडनं लिस्ट ए सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्याचे आकडे जबरदस्त आहेत. त्यानं लिस्ट ए क्रिकेटमध्ये 66 इनिंगमध्ये 54 च्या सरासरीनं 3355 धावा केल्या आहेत. त्यात 11 शतकं आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. लखनौ वन डेत सलामीचा शुभमन गिल आणि शिखर धवन एकेरी धावसंख्येवरच माघारी परतले होते. पण तरीही ऋतुराजला पदार्पणाच्या सामन्यानंतर पुन्हा ड्रेसिंग रुममध्ये बसावं लागलं. हेही वाचा - T20 World Cup: रोहित अँड कंपनीसाठी पुढचे 8 दिवस खास, कसं सुरु आहे टीम इंडियाचं प्रॅक्टिस सेशन? Video चाहत्यांकडून सवाल टीम इंडियाच्या या निर्णयावर अनेक जणांनी सोशल मीडियात आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि बीसीसीआयवर ताशेरे ओढले आहेत.
शाहबाज अहमदचं पदार्पण दरम्यान बंगालचा डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज अहमदनं रांची वन डेत भारतीय संघात पदार्पण केलं. भारताकडून वन डे खेळणारा तो आजवरचा 247वा खेळाडू ठरला. त्यानं आतापर्यंत 13 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 28 तर 21 लीस्ट ए मॅचमध्ये 18 विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन शिखर धवनकडून त्याला वन डे कॅप देण्यात आली.