JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / FIFA WC 2022: रोनाल्डोसारखा कोणी नाही! कतारमध्ये 'द ग्रेट रोनाल्डो'नं लिहिला 'हा' नवा इतिहास

FIFA WC 2022: रोनाल्डोसारखा कोणी नाही! कतारमध्ये 'द ग्रेट रोनाल्डो'नं लिहिला 'हा' नवा इतिहास

FIFA WC 2022: यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्येही पोर्तुगालच्या पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. त्यामुळे त्याच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला गेला आहे.

जाहिरात

ख्रिस्तियानो रोनाल्डोनं लिहिला नवा इतिहास

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दोहा-कतार, 24 नोव्हेंबर: पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा फुटबॉल विश्वातला सध्याचा अव्वल खेळाडू म्हणून ओळखला जातो. अवघ्या जगात रोनाल्डो लोकप्रियतेच्या बाबतीतही शिखरावर आहे. रोनाल्डोच्या मैदानातल्या कामगिरीनंच त्याला आजवरचा सर्वश्रेष्ठ फुटबॉलर बनवलं आहे. यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्येही त्यानं पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. त्यामुळे त्याच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला गेला आहे. पोर्तुलागनं घानाचा 3-2 असा पराभव करुन यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी दिली. या सामन्यात पोर्तुगालचं खातं खोललं ते रोनाल्डोनंच. रोनाल्डोचा ऐतिहासिक गोल घानाविरुद्धच्या सामन्यात पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत राहिला. पण दुसऱ्या हाफमध्ये 65 व्या मिनिटाला रोनाल्डोनं पोर्तुगालचं खातं खोललं. पेनल्टी किकवर त्यानं पहिल्या गोलची नोंद केली. याच कामगिरीसह पाचही वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा तो जगातला पहिला फुटबॉलर ठरला. 2006 पासून वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत रोनाल्डोनं आठ गोल केले आहेत. महत्वाचं म्हणजे वर्ल्ड कपमध्ये त्यानं गोल केलेला एकही सामना पोर्तुगालनं गमावलेला नाही.

संबंधित बातम्या

हेही वाचा -  FIFA WC 2022: जपाननं फक्त मॅच नाही तर मनंही जिंकली… जगाला दिला ‘हा’ महत्वाचा संदेश, पाहा Video रोनाल्डोचे वर्ल्ड कप गोल 1 - वि. इराण (2006) 2- वि. उत्तर कोरिया (2010) 3- वि. घाना (2014) 4- वि. स्पेन (2018) पेनल्टी 5- वि. स्पेन (2018) 6- वि. स्पेन (2018) 7- वि. मोरोक्को (2018) 8- वि. घाना (2022)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या