मुंबई, 22 जानेवारी : शनिवारी रायपूरमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामना पारपडला. या सामन्यात भारताच्या विजयापेक्षा कर्णधार रोहित शर्माच्या विसरभोळ्या स्वभावाचीच जास्त चर्चा झाली. दुसऱ्या वनडे सामन्याआधी रोहित शर्मा न्यूझीलंडच्या कर्णधारासोबत टॉससाठी गेला, परंतु टॉस जिंकल्यानंतर रोहित बॉलिंग आणि बॅटिंगपैकी नक्की काय निवडायचे तेच विसरला. यावरून रोहित शर्माला सोशल मीडियावर फार ट्रोल केलं जात आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान टॉसचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. अशातच आता विसराळू रोहितचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रोहित मैदानात जात असताना बॅट ही विसरल्याचे दिसते. हे ही वाचा : स्टार क्रिकेटर अडकला लग्नबंधनात; सोशल मीडियावर फोटो व्हायरल रोहित बॅटिंगसाठी मैदानात जात असताना तो खाली मान घालून काहीतरी विचार करीत होता. तेवढ्यात त्याला मागून संघाच्या स्टाफने आवाज दिला. त्यानंतर रोहित शर्मा पुन्हा मैदानाबाहेर आला आणि बॅट घेऊन पुन्हा खेळपट्टीवर उतरला.
विराट कोहलीने देखील एका मुलाखतीत रोहितच्या विसरभोळेपणा विषयी सांगितले होते. विराट म्हणाला होता की, रोहित शर्मा जितका विसरभोळा आहे तितकं कोणी असेल असं मलावाटत नाही. आयपॅड, वॉलेट, घड्याळ, दररोज वापरासारख्या गोष्टी तो अनेकदा विसरतो. इतकंच नाही तर त्याला आपण आपलं सामान विसरलोय हे, देखील कळत नाही. एकदा त्याला हॉटेलमध्ये गेल्यावर आठवलं होतं की त्याचा आयपॅड विमानात राहिला होता. तसेच रोहित एकदा त्यांची इंगेजमेंट रिंग देखील हॉटेलच्या रूमवर विसरला आहे"