JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 200 केल्यास आणि 3 सामन्यात बाहेर बसलास? रोहितच्या प्रश्नावर इशान म्हणाला, भाई...

200 केल्यास आणि 3 सामन्यात बाहेर बसलास? रोहितच्या प्रश्नावर इशान म्हणाला, भाई...

इशान किशनने नुकतंच बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यात द्विशतक केलं होतं. मात्र त्यानंतरही त्याला श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत एकदाही संधी मिळाली नव्हती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 19 जानेवारी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 18 जानेवारीपासून सुरू झाली. यातील पहिल्या सामन्यात भारताने 12 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलने 208 धावांची जबरदस्त खेळी केली. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. सामन्यानंतर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी शुभमन गिलचे 200 क्लबमध्ये स्वागत केलं. तेव्हा तिघांच्या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बीसीसीआय़ने हा व्हिडीओ शेअर केलाय. कर्णधार रोहित शर्मा इशान किशनला ट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यावर इशान किशनने हजरजबाबीपणे उत्तर दिलं. यावर तिघेही पोट धरून हसायला लागले. इशान किशनने नुकतंच बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यात द्विशतक केलं होतं. मात्र त्यानंतरही त्याला श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत एकदाही संधी मिळाली नव्हती.

संबंधित बातम्या

हेही वाचा :  विराटने रणजी ट्रॉफीत खेळायला हवं, सचिनचं उदाहरण देत शास्त्री गुरुजींचा सल्ला श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत केएल राहुल संघात होता आणि त्यामुळे इशान किशनला संघात संधी मिळाली नव्हती. शुभमन गिलच्या द्विशतकानंतर त्याच्यासोबत चर्चा करत असताना रोहित शर्माने इशान किशनला म्हणलं की, इशान, तू 200 धावा केल्यास आणि पुन्हा तीन सामन्यात तू खेळला नाहीस… यावर इशानने रोहित शर्माचं वाक्य पूर्ण होण्याआधीच भाई, कॅप्टन तर तूच होतास असं उत्तर दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या