मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराटने रणजी ट्रॉफीत खेळायला हवं, सचिनचं उदाहरण देत शास्त्री गुरुजींचा सल्ला

विराटने रणजी ट्रॉफीत खेळायला हवं, सचिनचं उदाहरण देत शास्त्री गुरुजींचा सल्ला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना 24 जानेवारीला होणार आहे. याच दिवशी रणजी ट्रॉफीत दिल्ली आणि हैदराबाद यांचा सामना सुरू होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना 24 जानेवारीला होणार आहे. याच दिवशी रणजी ट्रॉफीत दिल्ली आणि हैदराबाद यांचा सामना सुरू होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना 24 जानेवारीला होणार आहे. याच दिवशी रणजी ट्रॉफीत दिल्ली आणि हैदराबाद यांचा सामना सुरू होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

हैदराबाद, 19 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी विराट कोहलीला मोठा सल्ला दिला आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अखेरचा सामना विराटने खेळू नये असं रवि शास्त्री यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका होणार आहे. या पार्श्वभूमीवर विराट कोहलीला रेड बॉल क्रिकेट खेळण्याची गरज आहे. त्यामुळे विराटने शेवटचा एकदिवसीय सामना न खेळता प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला हवं असं मत रवि शास्त्री यांनी मांडलं आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना 24 जानेवारीला होणार आहे. याच दिवशी रणजी ट्रॉफीत दिल्ली आणि हैदराबाद यांचा सामना सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने भारतासाठी बॉर्डर गावस्कर मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे विराट कोहलीचा फॉर्म महत्त्वाचा असेल. कोहलीने टी२० सह एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण अद्याप कसोटीमध्ये त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहलीने फक्त ४५ धावा केल्या होत्या.

हेही वाचा : शुभमनसाठी शार्दुलने केला मोठा त्याग, द्विशतक होण्याआधीचा VIDEO VIRAL

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यावेळी कमेंट्री करताना रवि शास्त्री यांनी म्हटलं की, माझं नेहमीच असं म्हणणं आहे की विराटने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला हवं. जेव्हा तुम्हाला भारतात खूप सामने खेळायचे असतात. मला वाटतंय की आपले दिग्गज खेळाडू सध्या प्रथम श्रेणीतलं क्रिकेट खेळत नाहीयेत. जास्त क्रिकेट खेळलं जात आहे त्यामुळे तुम्ही रिस्क घेत नाही, पण तुम्हाला बऱ्याचदा थोडं स्मार्ट बनावं लागतं आणि भविष्यातील आव्हाने पाहता काही सामने सोडावे लागू शकतात. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका हे मोठं आव्हान असणार आहे.

रवि शास्त्री यांनी विराटला सल्ला देताना सचिनचं उदाहरण दिलंय. ते म्हणाले की, २५ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर सीसीआयमध्ये एका ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळायला गेला होता. तिथं त्याने द्विशतक केलं होतं. दोन महिन्यांनी १९९८ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येक फॉरमॅटमध्ये १ हजारहून जास्त धावा केल्या. त्यानं द्विशतक केलं आणि ऑस्ट्रेलियाला समजलं की ते या खेळाडूला लवकर आऊट करू शकणार नाहीत.

हेही वाचा : कुणी वैज्ञानिक तर कुणी शिक्षक, पार्ट टाइम हॉकी खेळून पहिल्यांदाच वर्ल्ड कपसाठी पात्र

विराट कोहलीची न्यूझीलंड दौऱ्यात फक्त एकदिवसीय मालिकेसाठी निवड झालीय. त्यामुळे शेवटचा एकदिवसीय सामना तो खेळला नाही तर बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेच्या तयारीसाठी त्याला वेळ मिळेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

First published:

Tags: Cricket, India, Ravi shastri, Virat kohli