JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ऋषभ पंतवर दिल्लीत होणार उपचार? गरज पडल्यास एअर लिफ्ट करण्याची तयारी

ऋषभ पंतवर दिल्लीत होणार उपचार? गरज पडल्यास एअर लिफ्ट करण्याची तयारी

पंतला सर्वाधिक दुखापत डोक्याला आणि पायाला आहे. यामुळे त्याच्या मेंदुचे आणि पायाचे एमआरआय स्कॅनही करण्यात आले होते.

जाहिरात

मर्सिडीज एएमजी जीएलई ४३ ४मेटिक कूपचे उत्पादन आता बंद करण्यात आले आहे. ऋषभ पंतने ही कार सप्टेंबर २०१९ मध्ये खरेदी केली होती. त्याच्या कारचे रजिस्ट्रेशन २५ सप्टेंबर २०१९ रोजी करण्यात आलं होतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 डिसेंबर : भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या कारचा काल अपघात झाला. यानंतर त्याच्यावर डेहराडूनमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने पंतबाबत मोठं विधान केलं आहे. डीडीसीएची टीम डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलला निघाली आहे. पंतवर जिथे उपचार सुरू आहेत तिथे पोहोचून प्रकृतीची माहिती घेतली जाईल. त्याच्या प्रकृतीत सुधारणा किती आहे? त्याला काही गोष्टींची गरज आहे का? हे पाहिलं जाणार असल्याचं डीडीसीएने म्हटलं आहे. आमच्या टीमला जर वाटलं की, ऋषभ पंतवर दिल्लीत उपचार करायला हवेत तर त्यासाठी वेळ घालवणार नाही. तात्काळ एअरलिफ्ट करून त्याला डेहराडूनहून दिल्लीला आणलं जाऊ शकतं. दिल्लीत ऋषभ पंतवर प्लास्टिक सर्जरी केली जाऊ शकते असं डीडीसीएने म्हटलं. हेही वाचा :  अवघ्या 5 सेकंदात वाचला ऋषभ पंतचा जीव, जीव वाचवणाऱ्या देवदुताने सांगितली हकीकत डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांनी सांगितले की, ऋषभ पंतची प्रकृती कशी आहे हे पाहण्यासाठी डीडीसीएची टीम डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात जात आहे. गरज पडली तर आम्ही त्याला दिल्लीला शिफ्ट करू. यामध्ये अशीही शक्यता आहे की, प्लास्टिक सर्जरीसाठी ऋषभ पंतला दिल्लीला एअरलिफ्ट करून आणू. पंतला सर्वाधिक दुखापत डोक्याला आणि पायाला आहे. यामुळे त्याच्या मेंदुचे आणि पायाचे एमआरआय स्कॅनही करण्यात आले होते. याचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. तर डॉक्टरांनी सांगितले की, अद्याप गुडघ्याचे एमआरआय स्कॅन केलेले नाही. ऋषभ पंतला त्रास होत असून त्याच्या पायाला सूज असल्याने एमआरआय स्कॅन करण्यात आलेले नाही. ते आज होण्याची शक्यता आहे. हेही वाचा :  कारमधून बाहेर काढलं आणि…, पंतचा जीव वाचवणाऱ्या बसचालकाने सांगितलं नेमकं काय घडलं?

 कार अपघातात ऋषभ पंतच्या चेहऱ्यावर जखम झाली होती. दोन ठिकाणी कापलं होतं तर काही ठिकाणी खरचटलं आहे. तर गुढघ्याला आणि टाचेला दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्याला बरं वाटत असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या