जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कारमधून बाहेर काढलं आणि..., पंतचा जीव वाचवणाऱ्या बसचालकाने सांगितलं नेमकं काय घडलं?

कारमधून बाहेर काढलं आणि..., पंतचा जीव वाचवणाऱ्या बसचालकाने सांगितलं नेमकं काय घडलं?

कारमधून बाहेर काढलं आणि..., पंतचा जीव वाचवणाऱ्या बसचालकाने सांगितलं नेमकं काय घडलं?

क्रिकेटर ऋषभ पंत याचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. दिल्ली -डेहराडून मार्गावर हा अपघात झाला. या अपघातामध्ये ऋषभ पंतला कारमधून बाहेर काढणाऱ्या बसचालकाचा सत्कार करण्यात आला आहे.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : क्रिकेटर ऋषभ पंत याचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. दिल्ली -डेहराडून मार्गावर हा अपघात झाला. अपघातानंतर लगेचच कारने पेट घेतला. अपघातानंतर ऋषभ पंत याला गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत करणाऱ्या बसचालक सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत यांचा हरियाणा रोडवेजच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. आता या कर्मचाऱ्यांचा हरियाणा सरकार देखील सत्कार करण्याची शक्यता आहे. हरियाणा रोडवेजच्या पानिपत डेपोचे महाव्यवस्थापक कुलदीप जांगडा यांनी कौतुकपत्र देऊन या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. भारधाव कार डिव्हायडरला धडकल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत पंतला सुरक्षित बाहेर काढले होते. कर्मचाऱ्यांचा सत्कार याबाबत बोलताना पानिपत डेपोचे महाव्यवस्थापक कुलदीप जांगडा यांनी म्हटलं की, आम्ही ऋषभ पंत याला गाडीतून बाहेर काढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला आहे. त्यांनी केलेल्या कार्यासाठी राज्य सरकार देखील या कर्मचाऱ्यांचा सत्कार करू शकते. दरम्यान ऋषभ पंत याला गाडीतून बाहेर काढणारे कंडक्टर परमजीत यांनी म्हटलं आहे की, गाडीचा दुभाजकाला धडकून अपघात झाल्यानंतर आम्ही तिथे धाव घेतली, पंतला बाहेर काढले. त्यानंतर अवघ्या 5-7 सेकंदात कारने पेट घेतला. या अपघातामध्ये ही कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या अपघातामध्ये पंत गंभीर जखमी झाला आहे. हेही वाचा :  Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत BCCI ने दिली मोठी अपडेट हरियाणा सरकारकडून दखल दरम्यान ऋषभ पंत याला गाडीतून बाहेर काढणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल हरियाणा सरकारने देखील घेतली आहे. याबाबत बोलताना हरियाणाचे परिवहन मंत्री मूलचंद शर्मा यांनी देखील चालक सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत याचं कौतुक केलं आहे. या कर्मचाऱ्यांनी मानवतेचा आदर्श घालून दिल्याचं मंत्री मूलचंद शर्मा यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात