JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / आयपीएलमध्ये रिषभच्या उपस्थितीवर रिकी पॉटिंगच सूचक वक्तव्य

आयपीएलमध्ये रिषभच्या उपस्थितीवर रिकी पॉटिंगच सूचक वक्तव्य

रिषभ उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याने दोन आठवड्यात त्याला डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. अशातच आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटिंग याने रिषभच्या आयपीएल सामन्यांमध्ये उपस्थित राहण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जानेवारी : भारताचा स्टार खेळाडू आणि आयपीएलमध्ये दिल्ली संघाचा कर्णधार असलेला रिषभ पंत सध्या त्याच्या प्रकृतीशी झुंज देत आहे. 30 डिसेंबरला रिषभच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात रिषभ गंभीर जखमी झाला असून त्याच्या गुडघ्यांवर दोनदा लिगामेंट सर्जरी करण्यात आली आहे. रिषभ उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याने दोन आठवड्यात त्याला डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. अशातच आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटिंग याने रिषभच्या आयपीएल सामन्यांमध्ये उपस्थित राहण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. हे ही वाचा : न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकला पण एक चुक टीम इंडियाला पडली महागात; ICC ने केला दंड रिकी पॉटिंगने काही दिवसांपूर्वी आयसीसीच्या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ऋषभ पंतची रिप्लेसमेंट मिळणे कठिण आहे असे सांगितले. आम्हाला एक विकेटकिपर बॅट्समन हवा आहे. मात्र दिल्ली कॅपिटल्सच्या दृष्टीने पंत अत्यंत महत्वाचा आहे". हे ही वाचा : 11 हजार रन करणाऱ्याला टीम इंडियात संधी नाही, मग तू कोण? सर्फराजच्या त्या मुलाखतीवर संघाच्या निवडकर्त्याचं उत्तर पॉटिंग पुढे म्हणाला की, “मी रिषभ पंतला माझ्या सोबत डग आऊटमध्ये प्रत्येक दिवस, आठवडे ठेवू इच्छितो. जर तो आयपीएलदरम्यान आमच्यासोबत राहू शकला तर मी त्याला कायम डग आऊटमध्ये ठेवणार. त्याची संघातील उपस्थिती सर्वांना प्रभावित करेल”.  “रिषभ पंत सारखे खेळाडू झाडाला लागलेले नसतात. आम्हाला याबाबत विचार करावा लागले. आम्ही त्याच्या पर्यायाबाबत विचार करत आहोत. आम्हाला एक विकेटकिपर फलंदाज पाहिजे आहे, परंतु पंतसारख्या खेळाडूचा आम्हाला पर्याय मिळत नाही” असे रिकी पॉटिंगने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या