Ravi Bishnoi
मुंबई, 20 एप्रिल: आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG)यांच्याच 31 वा सामना खेळवण्यात आला. या मॅचमध्ये आरसीबीने लखनऊ सुपर जाएंट्सवर 18 रनने विजय मिळवला आहे. लखनऊच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर रवि बिश्नोई (Ravi Bishnoi) ला जबाबदार धरले जात आहे. आयपीएलचा 31 वा सामना मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात संघाची सुरुवातही चांगली झाली आणि लवकरच 3 विकेट्स मिळाल्या, मात्र त्यानंतर संघ सामन्यात पिछाडीवर पडला आणि पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण एक मिस्ट्री स्पिनर ठरला जो सर्वात महागडा ठरला. Athiya Shetty- KL Rahul लवकरच बांधणार लग्नगाठ, समोर आला Wedding Plan लखनऊ सुपर जायंट्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध मोसमातील तिसरा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारणही रवी बिश्नोई ठरला. या सामन्यात बिष्णोईने 4 षटकात 11.75 च्या इकॉनॉमीमध्ये 47 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. लखनऊ सुपर जायंट्ससाठी रवी बिश्नोई हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या चेंडूंवर बंगळुरूच्या फलंदाजांनी 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. लखनऊसाठी या मोसमात बिश्नोईने चांगली कामगिरी केली, पण या सामन्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी रवी बिश्नोईवर विश्वास दाखवला होता. मेगा लिलावापूर्वी लखनऊने बिश्नोईला 4 कोटी रुपयांना विकत घेतले होते. या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये त्याने 7.82 च्या सरासरीने 5 बळी घेतले आहेत. बिश्नोईने आयपीएलमध्ये एकूण 30 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 7.17 च्या इकॉनॉमीने 29 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल 2022 मध्ये, लखनऊ सुपर जायंट्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मोसमातील तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लखनऊने या मोसमात आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 4 सामने जिंकले आहेत आणि 3 सामने गमावले आहेत. लखनऊ सुपर जायंट्स सध्या 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.