अभिनेत्री अथिया शेट्टी(Athiya Shetty) आणि क्रिकेटपटू के. एल. राहुल (KL Rahul) यांचं नातं कुणापासून लपलेलं नाही. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आहेत, हे जगजाहिर आहे. नुकतंच क्रिकेटर के. एल. राहुलचा ( KL Rahul Birthday ) वाढदिवस झाला या खास दिवसाचं निमित्त साधत अथिया शेट्टीनं के एल राहुलसोबतचे काही रोमॅंटीक फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट करत के. एल. राहुलनं कमेंट करत प्रेमाची जाहिर कबुलीच दिली आहे. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली होती. त्यांनतर आता या दोघांच्या लग्नाची माहिती समोर आली आहे.हे लग्न साऊथ इंडियन पद्धतीने होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी अथियाच्या वाढदिवसाला म्हणजेच, गेल्या 5 नोव्हेंबरला के.एल.राहुलने तिला विश करत, तिच्यासोबतचा सुंदर फोटो पोस्ट केला होता. हॅपी बर्थ डे माय हार्ट, असं लिहित त्यानं अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यांनतर दोघेही सतत एकेमकांसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसून आले आहेत. आथिया केएलसोबत अनेक सामन्यांसाठी विदेश दौरा करत असते. त्यामुळे हे दोघे लग्न कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. या बातमीनंतर त्यांच्या चाहत्यांना फारच आनंद झालेला असणार हे नक्की.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.