आयसीसी टी20 वर्ल्ड कप विजेत्यांना कोट्यवधींचं बक्षिस
मुंबई, 30 सप्टेंबर**:** ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का या स्पर्धेच्या विजेत्याला बक्षिस रकमेपोटी किती रक्कम मिळते तुम्हाला माहित आहे? आयसीसीनं नुकतीच याबाबत माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या स्पर्धेच्या विजेत्याला बक्षिस म्हणून कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. विजेत्याला मिळणार 13 कोटी रुपये आयसीसीनं जाहीर केलेल्या माहितीमध्ये 13 नोव्हेंबरला आयसीसी टी20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला 1.6 मिलियन डॉलर्सचं बक्षिस मिळणार आहे. भारतीय चलनात याची किंमत तब्बल 13 कोटी रुपये आहे. तर उपविजेत्या संघाला साडे सहा कोटी रुपये मिळणार आहेत. टी20 वर्ल्ड कपमध्ये आयसीसी बक्षिस रकमेपोटी 45 कोटी रुपये मिळणार आहेत. या वर्ल्ड कपमध्ये 16 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 8 संघ 16 ते 21 ऑक्टोबरपर्यंत क्वालिफायर सामने होणार आहेत. ज्यात 4 टीम्स सुपर – 12 राऊंडसाठी पात्र ठरणार आहेत. या फेरीत भारतासह 8 संघ आधीच पात्र ठरले आहेत.
हेही वाचा - Women Asia Cup: पुन्हा आशिया कप, पुन्हा महामुकाबला… वर्ल्ड कपआधी बांगलादेशात भारत-पाक लढत हरणाऱ्या संघांनाही मिळणार बक्षिस आयसीसीच्या माहितीनुसार सेमीफायनलमध्ये हरणाऱ्या संघालाही बक्षिस मिळणार आहे. ही बक्षिस रक्कम 4 लाख डॉलर्स म्हणजेच 3.26 कोटी रुपये मिळणार आहेत. तर सुपर-8 राऊंडमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक संघाला 70 हजार यूएस डॉलर्स म्हणजेच 57 लाख रुपये मिळतील. सुपर-8 फेरीत सध्या भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका आधीच दाखल आहेत. दुसरीकडे अन्य आठपैकी 4 संघ सुपर -12 फेरीसाठी क्वालिफायर राऊंड खेळणार आहेत. त्यात नामिबिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज, स्कॉटलँड, आयर्लंड, झिम्बाब्वे, यूएई, स्कॉटलँड हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. 16 ऑक्टोबपासून क्वालिफायर राऊंड सुरु होणार. तर 22 ऑक्टोबरपासून सुपर -8 फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल.