मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Women Asia Cup: पुन्हा आशिया कप, पुन्हा महामुकाबला... वर्ल्ड कपआधी बांगलादेशात भारत-पाक लढत

Women Asia Cup: पुन्हा आशिया कप, पुन्हा महामुकाबला... वर्ल्ड कपआधी बांगलादेशात भारत-पाक लढत

वुमन्स आशिया कप

वुमन्स आशिया कप

Women Asia Cup: भारतीय पुरुष संघाप्रमाणेच महिलांच्या आशिया चषकावरतीही टीम इंडियाचं वर्चस्व आहे. कारण आजवर झालेल्या 7 पैकी 6 स्पर्धा भारतानं जिंकल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 29 सप्टेंबर: येत्या 1 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा आशिया चषक स्पर्धा होणार आहे. एशियन क्रिकेट काऊन्सिलनं आठव्यांदा महिलांच्या आशिया चषक स्पर्धेचं आयोजन केलं आहे. महिलांच्या या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत एकूण सात संघ सहभागी झाले आहेत. त्यामुळे राऊंड रॉबिन पद्धतीनं ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघ 6-6 सामने खेळणार आहे. पण सगळ्यांचं लक्ष असेल ते या स्पर्धेतल्या महामुकाबल्याकडे. भारत आणि पाकिस्तान संघ महिलांच्या आशिया कपमध्येही आमने सामने येणार आहेत.

7 ऑक्टोबरला महामुकाबला

1 ऑक्टोबरला यजमान बांगलादेश आणि थायलंड या सामन्यानं स्पर्धेची सुरुवात होईल. तर भारतीय संघ याच दिवशी श्रीलंकेशी दोन हात करणार आहे. तर 7 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं भारतासमोर आव्हान असेल. या स्पर्धेचं यंदाचं हे आठवं वर्ष आहे. 2018 पर्यंत नियमितपणे ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. पण कोरोनामुळे 2020 आणि 2021 मध्ये स्पर्धेचं आयोजन होऊ शकलं नाही.

दरम्यान 6-6 साखळी सामन्यानंतर सातपैकी टॉप 4 संघ सेमी फायनलमध्ये दाखल होतील. त्यानंतर 15 ऑक्टोबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. आधी ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवली जात होती. पण आता ही स्पर्धा 20-20 फॉरमॅटमध्ये होणार आहे.

हेही वाचा - Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेकडे नवी जबाबदारी, रहाणे बनला 'या' टी20 टीमचा कॅप्टन

7 पैकी 6 वेळा भारत विजयी

भारतीय पुरुष संघाप्रमाणेच महिलांच्या आशिया चषकावरतीही टीम इंडियाचं वर्चस्व आहे. कारण आजवर झालेल्या 7 पैकी 6 स्पर्धा भारतानं जिंकल्या आहेत. तर बांगलादेशनं 2018 साली सहा वेळा विजेत्या भारतीय संघाला हरवण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर 2020 साली कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. पुढे 2021 सालीही या स्पर्धेचं आयोजन होऊ शकलं नाही.

हेही वाचा - T20 World Cup Breaking: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का, वर्ल्ड कपमधून रोहितचा हुकमी एक्का 'आऊट'

बांगलादेशमध्ये स्पर्धेचं आयोजन

महिला आशिया कपचे सगळे सामने बांगलादेशमध्ये खेळवण्यात येणार आहेत. 2018 नंतर पहिल्यांदाच बांगलादेशमध्ये महिलांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होणार आहेत. बांगलादेशच्या सिल्हट आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हे सामने पार पडतील. सकाळी 9.00 आणि दुपारच्या सत्रातील सामने 1.00 वाजता या सुरु होतील. दरम्यान स्टार स्पोर्टस नेटवर्क आणि डिस्ने हॉटस्टारवर या सामन्यांचं प्रक्षेपण केलं जाणार आहे.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Women's cricket Asia Cup