पृथ्वी शॉ
मुंबई, 16 सप्टेंबर**:** बीसीसीआयनं न्यूझीलंड अ संघाविरुद्ध होणाऱअया एकदिवसीय सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा केली आहे. टी20 वर्ल्ड कप संघात स्थान न मिळालेला विकेट कीपर बॅट्समन संजू सॅमसन हा या टीमचं नेतृत्व करेल. तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील या संघात मुंबईचा धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाची दारं पृथ्वीसाठी खुली झाली आहेत. दुलिप ट्रॉफीत पृथ्वीचा धमाका सध्या सुरु असलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वी शॉ वेस्ट झोन संघात आहे. वेस्ट झोनकडून खेळताना पृथ्वीनं पहिल्या सामन्यात शतक झळकावलं. नॉर्थ झोनविरुद्धच्या त्या सामन्यात पृथ्वीनं 113 धावांची खेळी केली. तर सेंट्रल झोनविरुद्ध त्यानं 60 धावा फटकावल्या. त्यामुळे याच कामगिरीच्या आधारे न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या वन डे सामन्यांसाठी पृथ्वीची भारतीय संघात वर्णी लागली आहे. न्यूझीलंड अ आणि भारत अ संघात तीन चारदिवसीय सामन्यांची मालिका सध्या सुरु आहे. त्यानंतर 22 सप्टेंबरपासून वन डे सामन्यांना सुरुवात होईल. ऋतुराज-त्रिपाठीही संघात पृथ्वी शॉसह महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांनाही भारत अ संघात जागा मिळाली आहे. ऋतुराजनं न्यूझीलंड अ विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावलं होतं. त्याच्या 113 धावांच्या खेळीमुळे भारत अ संघाला पहिल्या डावाच 293 धावांची मजल मारता आली होती. दरम्यान न्यूझीलंड अ आणि भारत अ संघात 22, 25 आणि 27 सप्टेंबरला तीन वन डे खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने चेन्नईमध्ये आयोजिक करण्यात आले आहेत.
हेही वाचा - Mumbai Indians: बाऊचर मुंबई इंडियन्सचा सातवा कोच… पाहा ‘MI पलटन’ला आजवर कुणाकुणाचं मिळालं मार्गदर्शन? भारत अ संघ – संजू सॅमसन (कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, के. एस. भरत, कुलदीप यादव, शाहबाझ अहमद, राहुल चहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दूल ठाकूर, उमरान मलिक, नवदीप सैनी, राज अंगद बावा