कराची, 24 डिसेंबर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी मोठा निर्णय घेत माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीकडे मोठी जबाबदारी सोपवली. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेआधी शाहिद आफ्रिदीला पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीचा हंगामी अध्यक्ष केलं आहे. या पॅनेलमध्ये पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाक आणि राव इफ्तिखार अंजुम यांचा समावेश आहे. हारून राशीद हे संयोजक असताली. नजम सेठी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष बनल्यानंतर काही दिवसातच याची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही निवड समिती केवळ न्यूझीलंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे त्यासाठी नियुक्त केली आहे. या समितीवर मोहम्मद वसिम यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निवडलेल्या कसोटी संघाची समीक्षा करण्याची जबाबदारी असेल. हेही वाचा : कोहली अन् केएल राहुल फ्लॉप, टीम इंडियावर परभवाचे संकट; WTC फायनलचे स्वप्न भंगणार? ट्विटरवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितलं की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला पुरुषांच्या राष्ट्रीय निवड समितीचा हंगामी अध्यक्ष केलं आहे. अब्दुल रज्जाक आणि राव इफ्तिखार अंजुम हे पॅनेलचे सदस्य असतील. पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटलं की, मी हंगामी राष्ट्रीय निवड समिती अध्यक्षांचे स्वागत करतो आणि यात काही शंका नाही की मर्यादीत वेळ असूनही ते धाडसी निर्णय घेतील. यामुळे आम्हाला न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळण्यासाठी एक भक्कम आणि प्रतिस्पर्धी संघ तयार करण्यात मदत होईल. हेही वाचा : BBL : ऑस्ट्रेलियाने मॅथ्यू वेडवर घातली एक सामन्याची बंदी, टीम पेनला 5 वर्षांनी संधी शाहिद आफ्रिदी हा एक आक्रमक क्रिकेटपटू आहे आणि त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत न घाबरता खेळून दाखवलं आहे. त्याच्याकडे २० वर्षांचा अनुभव आहे. सगळ्या प्रकारात त्याने मोठं यश मिळवलं असून ही महत्त्वाची गोष्ट आहे की त्याने नेहमीच तरुण खेळाडूंमधील प्रतिभेचं कौतुक केलं आहे. आधुनिक खेळाची मागणी आणि आव्हान समजण्यासाठी त्याच्याहून चांगला कुणीही नाही अशा शब्दात नजम सेठी यांनी आफ्रिदीचे कौतुक केले.