बिग बॅश लीगमध्ये खेळत असलेल्या होबार्ट हरिकेन्सचा कर्णधार मॅथ्यू वेडवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक सामन्याची बंदी घातली आहे. यामुळे 5 वर्षांनी टीम पेनला बीग बॅश लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. मॅथ्यू वेडच्या जागी होबार्ट हरिकेन्स संघात टीम पेनचा समावेश करण्यात आला. पाच वर्षांनी संघात समावेश झाल्यानतंर टीम पेनने हरिकेन्सकडून खेळताना 10 धावा केल्या. तर एकील हुसैनने 3 विकेट घेतल्या. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटलं की, गेल्या 18 महिन्यांमध्ये आचार संहितेचं वारंवार उल्लंघन केल्यानं मॅथ्यू वेडवर निलंबन करण्यात आलं आहे. वेडने नुकतंच पर्थ स्कॉचर्सचा स्टार फलंदाज फाफ डु प्लेसिस फलंदाजी करत असताना फटका मारण्याआधी मोठ्या आवाजात बोल्ड असं ओरडला होता. यानंतर फाफ डु प्लेसिस बाद झाला होता आणि तो रागातही दिसला. हेही वाचा : VIDEO : शर्टही काढ आता, विराटला मैदानातच आला राग; फलंदाजाला सुनावले हरिकेन्सच्या संघाकडून टीम पेनने अखेरचा सामना 4 फेब्रुवारी 2018 मध्ये खेळला होता. त्या सामन्यात होबार्ट हरिकेन्स आणि एडलेड स्ट्रायकर्स एकमेकांविरुद्ध लढले होते. टीम पेनने सेक्स्टिंग स्कँडलमुळे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. हॅरिकेन्ससाठी पेनने 44 सामन्यात 1129 धावा केल्या आहेत. होबार्ट हरिकेन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 122 धावा केल्या. जीम्मी निशामने 28, शादाब खानने 14, नाथन एलिसने 21, जोएल पेरिसने 12 आणि टीम पेनने 10 धावा केल्या. मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळणाऱ्या अकिल हुसैन आणि डेव्हिड मूडी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले तर रसेलने 2 विकेट घेतल्या. हेही वाचा : मेस्सीचं जय शहांना सरप्राइज, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जर्सी दिली गिफ्ट प्रत्युत्तरादाखल खेळताना मेलबर्न रेनेगेड्सकडून एरॉन फिंचने 13, अकील हुसैनने 11 आणि विल सदरलँडने 40 धावा केल्या. याशिवाय जोनाथन वेल्सने 26 धावांची खेळी केली. मेलबर्नसाठी रिले मेरेडिथने 3, जोएल पेरिस आणि शादाब खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.