रावळपिंडी, 05 डिसेंबर : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटीत इंग्लंडने ७४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने काही आश्चर्यचकीत करणारे निर्णयसुद्धा घेतले. स्टोक्सने डाव घोषित करण्याचा निर्णय़ घेतल्यानतंर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसंच अखेरच्या सत्रात फिल्डिंगमध्ये केलेले बदल पाकिस्तानला जाळ्यात अडकवणारे ठरले. पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात इमाम उल हक लवकर बाद झाल्यानंतर सौद शकील आणि मोहम्मन रिजवान यांनी संयमी फलंदाजी केली. मात्र 176 धावा झाल्या असताना मोहम्मद रिजवानसुद्धा 46 धावा करून बाद झाला. त्याला जेम्स अँडरसनने बाद केलं. मात्र शकील दुसऱ्या बाजूने मैदानावर टिकून होता. डावाच्या 62 व्या षटकात सौदला बेन स्टोक्सने त्याच्या चक्रव्युहात अडकवलं. बेन स्टोक्सने खेळपट्टीच्या जवळ 6 क्षेत्ररक्षक उभा केले. या चक्रव्युहात सौद फसला आणि जेनिंग्सच्या हाती झेल देत तो बाद झाला. हेही वाचा : इंग्लंडने पहिली कसोटी जिंकली, पहिल्यांदाच पाकिस्तानचा झाला ‘असा’ पराभव 11 धावात 5 विकेट सामन्याच्या शेवटच्या सत्रात पाकिस्तानने 11 धावात पाच विकेट गमावल्या. संघाचा डाव 268 धावातच गुंडाळला. अँडरसन आणि रॉबिन्सनने प्रत्येकी 4 गडी बाद केले. तर लीच आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. टी ब्रेकनंतर रॉबिन्सनने आगा सलमानला पायचित केलं. याशिवाय अजहर अली झेलबाद झाला. तर जाहिद मोहम्मदसुद्धा झेलबाद झाला. याशिवाय जेम्स अँडरसनने हरिस रउफला पायचित केलं.
डाव घोषित करण्याचा धाडसी निर्णय गोलंदाजांचा कर्दनकाळ असणाऱ्या खेळपट्टीवर बेन स्टोक्सने 264 धावांवर डाव घोषित करून पाकिस्तानला चार सत्रात विजयासाठी 343 धावांचे आव्हान दिले. त्याच्या या निर्णयाला अनेकांनी धाडसी म्हणत टीकाही केली.पण अखेरच्या टप्प्यात गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यात व्यूहरचना करत इंग्लंडच्या संघाने बाजी मारली आणि सामना तब्बल 74 धावांनी जिंकला. हेही वाचा : पोलंड फिफातून आऊट, गोलिकीपरच्या ४ वर्षांच्या चिमुकल्याला अश्रू अनावर; VIDEO VIRAL अनिर्णित कसोटीत रस नाही - स्टोक्स कसोटी सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला की, कसोटीआधी संघासोबत जे झालं त्याला आम्ही योजना बनवू शकत नाही. कसोटीसाठी आम्ही खेळाडुंच्या शोधासाठी आम्ही खूप धडपडत होतो. अनिर्णित कसोटी खेळण्म्यात आम्हाला काही रस नाही. आम्ही नशिबवान आहे की चेंडू रिव्हर्स स्विंग झाला. इंग्लंडच्या सर्वात मोठ्या विजयांपैकी हा मोठा विजय आहे.